श्रीगोंदा तालुक्याच्या पुर्व सरहद्दीवरील ग्रामस्थांशी अनुराधा नागवडेंनी साधला संवाद
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्याचा पुर्व भाग हा जिरायत व दुष्काळग्रस्त पट्टा समजला जातो. पश्चिम भाग हा घोड-विसापुर-कुकडी पाण्याच्या ओलिताखाली येणारा बागायत परीसर म्हणुन
ओळखला जातो,तालुक्याचे राजकारण देखील जिरायत-बागायत प्रश्नांभोवती फिरते. जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी तालुक्याच्या पुर्व
सरहद्दीवरील थिटेसांगवी,घोगरगाव,बांगर्डे
गावातील ग्रामस्थांशी नुकताच संवादसाधला त्यामुळे त्यांनी कोरडवाहू
भागाशी मायेचा ओलावा जपल्याची भावना येथील ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.
निमीत्त होते
थिटेसांगवीचे माजी सरपंच पांडाभाऊ उगले यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी
घेतलेल्या सदिच्छा भेटीचे,उगले हे पुर्व भागातील सीना
धरणग्रस्तांचे प्रतिनीधी.राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष स्व.शिवाजीराव नागवडे
यांचे समर्थक,आज ते आजारपणामुळे थकलेले असताना त्यांची भेट
घेण्यासाठी नागवडे थिटेसांगवी येथे आल्या असता परीसरातील ग्रामस्थ जमले,ग्रामस्थांच्या स्थानिक प्रश्नांविषयी चर्चा झाली,त्यामध्ये
प्रामुख्याने ऊस प्रश्न व सोसायटी कर्ज वाटप,रुईखेल-बांगर्डे
परीसरातील बंधार्याच्या पाणी गळती संदर्भात नागरीकांनी समस्या मांडल्या,ते सर्व प्रश्न सोडवण्याचा व पाठपुरावा करण्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला
व संबंधित अधिकार्यांना तशा सुचना दिल्या,यावेळी त्यांनी
थिटेसांगवी येथील प्रगतशील शेतकरी दिवंगत रामदास मुरलीधर बागल यांच्या
कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार
समिती संचालक संजय महांडुळे, नागवडे कारखान्याच्या संचालिका रेखाताई लकडे, सामाजिक कार्यकर्ते राहुल साळवे,विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष अदिल शेख,माजी
सरपंच नानाभाऊ बागल,टकले भाऊसाहेब,प्रशांत
वाळके, अशोक तापकीर,तुकाराम वाळके,दत्तात्रय रामदास बागल,संगिता उगले,सत्यम उगले,महेश उगले,वैभव
उगले आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या