* पंकजा मुंडेंनी काही शब्दांचा वापर केला असेलही
*सुधीर मुनगंटीवार यांनी
फेटाळली नाराजीची चर्चा
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
'कार्यकर्ते हे पक्षावर प्रेम
करतातच, पण कधी-कधी पक्षापेक्षा विशिष्ट नेत्यांवर थोडं
जास्त प्रेम करतात. पंकजाताईंबद्दल आत्मीयता असलेल्या अशा कार्यकर्त्यांनी,
पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी काही
दिवसांपूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर पंकजाताईंनी त्यांना समजावताना काही
शब्दांचा वापर केला असेलही, पण याचा अर्थ त्या नाराज आहेत
असं मला वाटत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्या पक्षाच्या बाहेर जाण्याचा विचार
सुद्धा करणार नाहीत,' असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त
केला.
नेमकं काय
म्हणाल्या होत्या मुंडे ?
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम
यांची वर्णी लागेल अशी चर्चा शेवटपर्यंत होती. मात्र, तसं काही झालं नाही. त्यांच्याऐवजी डॉ.
भागवत कराड यांना मंत्रिपद देण्यात आलं. मुंडे भगिनींना राजकीय शह देण्याचा हा
प्रयत्न असल्याची चर्चा होती. त्यातून मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली. त्यातील
७० ते ८० लोकांनी पक्षातील आपल्या विविध पदांचे राजीनामे देण्याची घोषणा केली व
मुंबईकडे पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी धाव घेतली होती. त्यांचे राजीनामे फेटाळत
पंकजा यांनी त्यांची समजूत काढली. ' नरेंद्र मोदी आणि अमित
शहा हेच माझे नेते आहेत. त्यांच्या मनात
माझ्याबद्दल चांगलं आहे, असा मला विश्वास आहे, असं त्या म्हणाल्या होत्या. '
भाजप हे आपलं घर आहे. ते आपण कष्टानं उभं केलं आहे. ज्यादिवशी छत अंगावर पडेल
आणि इथं राहण्यात राम नाही असं वाटेल तेव्हा पुढचा निर्णय घेऊ,' असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं.
0 टिप्पण्या