Ticker

6/Breaking/ticker-posts

भिस्तबाग तलाठी कार्यालाय परिसरातील नागरिकांचे रस्त्याअभावी प्रचंड हाल

 












लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर : अहमदनगर शहराच्या सावेडी उपनगरातल्या वेगाने विकसित होत असलेल्या भिस्तबाग रोड वरील तलाठी कार्यालायाच्या समोरील भागातील नागरिकांचे रस्त्या अभावी प्रचंड हाल होत आहेत. रस्ता नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.

 या रस्त्यावर एम.आय.डी.सी. मध्ये काम करणार्‍या  लोकांचे दिवस रात्र ये-जा चालू असते. हा रस्ता एकविरा चौक आणि त्या भागाशी जवळचा असल्यामुळे नागरिक या रस्त्यावरून ये-जा करत असतात. या रस्त्यावर भिस्तभाग तलाठी कार्यालय आणि महावितरण कार्यालय असल्यामुळे येथे नेहमी वर्दळ असते. परंतु प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रस्त्याअभावी नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत.

 शिवाय या भागात लाईटची सुध्दा व्यवस्था नाही. येथील भाग वेगाने विकसित होत असून प्रशासनाने रस्ता बनवण्यासाठी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या