*पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्राच्या अडचणीत वाढ
*शुक्रवारी झालेल्या
सुनावणी राज कुंद्राची पोलिस कोठडी २७ जुलै पर्यंत वाढवली
*अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं फेटाळले पतीवर लावण्यात आलेले सर्व आरोप
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शुक्रवारी मुंबई पोलीस राज कुंद्राला घेऊन
त्याच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी शिल्पाला राज समोरच कसून चौकशी केल्याचं
समजतं. शिल्पा शेट्टी या प्रकरणात राज कुंद्राच्या प्लॅनमध्ये सहभागी आहे का याचा
तपास पोलीस करत आहेत. कारण शिल्पा राजच्या विआन इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये
डायरेक्टर म्हणून काम पाहत होती. मात्र काही महिन्यांपूर्वीच तिने या पदाचा
राजीनामा दिला होता. त्यामुळे शिल्पाही पोलिसांच्या दृष्टीने एक संशयित आहे.
त्यामुळे आता पोलीस अधिकारी शिल्पाच्या बँक अकाउंटचीही तपासणी करणार आहेत.
पोलिसाचा दावा आहे की, हॉटशॉट्स अॅपवरील सर्व अश्लील कन्टेट
व्हिडिओ परदेशातील सर्व्हरवर स्ट्रीम करण्याचं काम विआन इंडस्ट्रीमधून होत असे.
तसेच सूत्रांच्या माहितीनुसार शिल्पा शेट्टीनं पोलीस चौकशीत पती राज कुंद्राचा
बचाव केला असून त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप तिनं फेटाळले आहेत. राज
कुंद्राच्या अॅपवर प्रसारित करण्यात आलेले व्हिडीओ हे पॉर्न नाहीत तर इरॉटिक
व्हिडिओ आहेत असं तिचं म्हणणं आहे.
दरम्यान राज
कुंद्रानं देखील स्वतःवर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच त्यानं
मुंबई उच्च न्यायालयात, आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा बेकायदेशीर असल्याचं अपील केलं आहे.
अशात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत राज कुंद्राची पोलीस कोठडी २७ जुलैपर्यंत
वाढवण्यात आली आहे. राज कुंद्रा चौकशी दरम्यान सहकार्य करत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
0 टिप्पण्या