लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पाथर्डी : करोना संपाला , आमच्याकडे काय २- ४ च पेशंट राहिलेत अशा चर्चा सध्या ग्रामीण भागात होताना दिसून येतात .परंतू गावकऱ्यानी वेळीच सावध व्हावे कारण करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे . पाथडी तालुक्यातील खेरवंडी कासारला पुन्हा कंटेनमेंट झोन जाहिर झाला असून २० जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे .
गेले दोन अडीच महिने सर्वसामान्यांचा श्वास कोंडला होता मात्र महिनाभरापूर्वी सर्व काही ऑन झाल्याने नागरिकांनी मोकळा श्वास घेतला , कोणतीही बंधन नसल्यामुळे मुक्त संचार सुरू झाला . बाजारपेठा गर्दोने फुलल्या मात्र तिसऱ्या लाटेच्या भीतिने सरकारने आठवडाभरातच बंधन सुरू केली . ग्रामीण भागात करोना गेल्याचा भास होऊ लागला .परंतु धोका टळलेला नाही . विशेषत : तालुक्याच्या पूर्व भागात रुग्णसंख्या वाढू लागली आहे .
तालुक्यातील खरवंडी कासारमध्ये रूग्ण वाढल्याने पुन्हा अत्या वश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊन लागू करावा लागला कोरोना रूग्णसख्यां वाढल्याने खरवंडी कासार कंटेनमेंट झोनचा आदेश तहसिलदार यांनी जारी केले . त्यामुळे आजपासुन दि . २० जुलै पर्यंत अत्यावशक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहेत . करोनाचे वादळ घोंगाऊ लागल्याने गावो गावी दहशत निर्माण झाली आहे . सावधगिरी व नियमांचे काटेकोर पालन हाच सध्या तरी उपाय असून नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
0 टिप्पण्या