Ticker

6/Breaking/ticker-posts

अरे बापरे ! प्रवाशांसमवेत चक्क सापानेही केला एसटी प्रवास.. !

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

कल्याण: प्रवाशांनी गच्च भरलेल्या एसटी बसमधून प्रवाशांसमवेत चक्क एका सापाने भिंवडी ते कल्याण असा प्रवास केल्याची घटना नुकतीच  घडली. बसचालकाने जीव मुठीत घेऊन बस आगारात आणल्यानंतर सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी गाडीच्या छताचा पत्रा कापून हा साप बाहेर काढला. तस्कर जातीच्या बिनविषारी सापाला सर्पमित्रांनी नंतर जंगलात सोडून दिले.

शहापूर डेपोची बस मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भिंवडी डेपोतून कल्याणकडे येण्यास निघाली. बस कोनच्या जवळपास पोचल्यानंतर बसमध्ये चालकाच्या डोक्यावर लांबलचक साप लटकत असल्याचे दिसताच प्रवाशांसह चालक आणि वाहकाची घाबरगुंडी उडाली. चालकाने बस बाजूला उभी करत आगारात याची माहिती दिली. अनेक प्रवाशांनीदेखील बसमधून उतरण्याचा निर्णय घेतला.

मात्र, याची माहिती मिळताच भिवंडीतील सुनील म्हात्रे यांनी चालकाला धीर देत चालकाबरोबर बसमधून प्रवास केला. साप गाडीच्या छतावरील पत्र्यात असल्याने त्याला बाहेर काढणे शक्य नव्हते. साप खाली आलाच तर आपण त्याला पकडू, असा धीर देत त्यांनी बस कल्याण आगारापर्यंत आणली. मात्र प्रवाशांच्या आरडाओरड्याने घाबरलेला साप पत्र्यातून बाहेर पडत नव्हता. अखेर बोंबे यांनी बसचा पत्रा कापून सापाला बाहेर काढत जीवदान दिले. हा साप बिनविषारी तस्कर जातीचा असल्याचे त्यांनी सांगितले. पुरानंतर निवासाच्या जागा पाण्याखाली गेल्याने सरपटणारे प्राणी सापडण्याचे प्रमाण वाढले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या