लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
बारामती तालुक्यातील अनेक गावांना दरवर्षी दुष्काळी
स्थितीला सामोरे जावे लागते. येथील सरासरी पर्जन्यमान ४२४.९ मिलीमिटरच्या दरम्यान
असते. बारामती तालुक्यातील २२ गावे जिरायती पट्ट्यामध्ये मोडतात. यामध्ये कारखेल
या गावाचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून कारखेल परिसरात तुरळक पाऊस सुरू होता. त्यात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या
सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. दरम्यान, ग्रामदैवत कोरेश्वर मंदिराच्या परिसरात
वीज कोसळली. माळरानावर ज्या ठिकाणी ही वीज कोसळली त्याठिकाणि जमिनीतून पाण्याचे
झरे वाहू लागले आहेत.
गावातील मेंढपाळ आणि
शेतकऱ्यांना माळरानावर अचानक जमिनीतून पाणी वाहताना दिसले आणि सगळेच अवाक् झाले.
याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा तयार झाला आहे. ही घटना पाहण्यासाठी
ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत राजहंस भापकर या गावकऱ्याने
प्रतिक्रिया दिली. आमच्या गावात कायमच पाण्याचे दुर्भिक्ष असते. उन्हाळ्यामध्ये
जनावरांसह माणसांचे देखील पाण्यामुळे हाल होतात. वीज पडल्याने आमच्या दुष्काळी
गावात गंगा अवतरली आहे, असे भापकर
म्हणाले.
0 टिप्पण्या