*मंदीर
बंद असल्याने प्रवेशद्वारातूनच घेतले भाविकांनी दर्शन
*श्रद्धेने
गुरुंच्या विचाराने निष्ठा ठेऊन भक्ती करा- महंत भास्करगिरी महाराज
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
श्री
क्षेत्र देवगड :नेवासा
तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली साध्या
पद्धतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.मंदीर बंद असल्याने हजारो
भाविकांनी सामाजिक अंतराचे पालन करत प्रवेशद्वारातून दर्शन घेऊन आपला भक्तिभाव
वृद्धिंगत केला.जीवनाला सुंदर बनविण्यासाठी गुरू आज्ञेने गुरू विचाराने व
श्रद्धेने निष्ठा ठेऊन भक्ती गुरूंची भक्ती करा असे आवाहन श्री गुरुदेव दत्त
पिठाचे प्रमुख महंत भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी
प्रसार माध्यमांना संदेश देतांना केले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने
शुक्रवारी (दि.२३) पहाटेच्या सुमारास भास्करगिरी
महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांसह मंदिर प्रांगणातील श्री समर्थ सदगुरू
किसनगिरी बाबांच्या मूर्तीसह समाधीस वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात
आला.यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य भेंडा
येथील हेमंत कुलकर्णी व पुजारी दत्ता महाराज शिंदे
यांनी केले.दुपारच्या सत्रात भगवान दत्तात्रयांची आरती करण्यात
आली.गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भजनी मंडळाच्या वतीने भजने गाण्यात आली.झालेल्या
आरती प्रसंगी भास्करगिरी बाबांच्या समवेत हभप रामनाथ
महाराज पवार, गिरीजानाथ महाराज जाधव, हभप
बाळू महाराज कानडे,तात्या महाराज शिंदे,सुरक्षा अधिकारी बबनराव वरघुडे उपस्थित होते.
कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर सद्या श्री दत्त मंदिर बंद असून यावेळी दर्शनासाठी आलेल्या तुरळक भाविकांनी
श्री दत्त मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच श्री भगवान दत्तात्रयांचे व श्री समर्थ
सदगुरु किसनगिरी बाबांसह पंचमुखी सिद्धेश्वर, कार्तिक
स्वामींचे दर्शन घेतले.तुरळक प्रमाणात उपस्थित असलेल्या भाविकांनी भास्करगिरी बाबांचे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संतपूजन केले.
0 टिप्पण्या