Ticker

6/Breaking/ticker-posts

संवेदनशील मुख्यमंत्री ! उद्धव ठाकरेंमुळे वाचले अपघातग्रस्त तरुणांचे प्राण

 

*सोमवारी रात्री दाखल झाले होते पंढरपुरात

*मुख्यमंत्र्यांच्या प्रसंगावधानामुळं दोन तरुणांचा जीव वाचला








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 सोलापूरः आषाढी एकदशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी रात्रीच पंढरपुरात दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत होते. या प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या प्रसंगावधानामुळं दोन अपघातग्रस्त तरुणांचे प्राण वाचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळं सध्या त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत.

सोमवारी दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंसोबत पंढरपूरकडे रवाना झाले. विशेष, म्हणजे यावेळी ते स्वतः गाडी चालवत होते. या प्रवासादरम्यान पंढरपुर जवळीच करंबक गावाजवळ दोन दुचाकी स्वारांचा अपघात झाल्याची माहिती त्यांना मिळाली. ही माहिती मिळाल्यास मुख्यमंत्र्यांनी वेळ न दवडता आपल्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकाची गाडी व रुग्णवाहिका या तरुणांच्या मदतीसाठी पाठवली. रुग्णवाहिका वेळेत मिळाल्यानं या दोन्ही तरुणांना लवकर उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले.

मुख्यमंत्री पंढरपुरात दाखल झाल्यानंतर त्यांनी या दोन तरुणांच्या प्रकृतीची चौकशीदेखील केली. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळं सोशल मीडियावरही त्यांचं कौतुक होताना दिसतंय. शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही ट्वीट केलं आहे. यावेळी त्यांनी संवेदनशील मुख्यमंत्री असंही म्हटलं आहे. जनतेची काळजी असणारे कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. पंढरपूरला महापुजेसाठी जात असताना करकंब गावाजवळ दोन बाईकस्वारांचा भीषण अपघात झाल्याचे कळाल्यावर स्वतःच्या ताफ्यातील रुग्णवाहिका त्यांच्या मदतीसाठी देण्याचे आदेश दिले, असं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या