लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई- बॉलिवूडचे 'ट्रॅजेडी किंग' दिलीप
कुमार नुकतेच काळाच्या पडद्याआड
गेले. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली. संपूर्ण भारतातून
त्यांच्या जाण्याचं दुःख व्यक्त करण्यात आलं. अशात भाजप नेता अरुण यादव यांनी
दिलीप कुमार यांनीही श्रद्धांजली वाहिली. पण त्यांनी ट्विटमध्ये दिलीप कुमार
यांच्या नावाचा विचित्र संदर्भ दिला. दिलीप कुमार यांनी पैसे कमावण्यासाठी हिंदू
नावाचा वापर केला, असं अरुण यांनी लिहिलं. त्यांच्या ट्विटवर
लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सडेतोड उत्तर देत अरुण यांची बोलती बंद
केली.
हरियाणा राज्यातील भाजप आयटी सेल आणि सोशल मीडिया
प्रमुख असलेले अरुण यादव यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली देताना लिहिलं, 'चित्रपटसृष्टीत हिंदू नाव ठेवून पैसे
कमावणाऱ्या मोहम्मद युसूफ खान यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचं अपरिमित
नुकसान झालं आहे. त्यांच्या कुटुंबियांसाठी वाईट वाटलं. देव त्यांच्या आत्म्याला
शांती देवो.' अरुण यांचं हे ट्विट प्रचंड वायरल झालं.
उर्मिलाने या ट्विटवर त्यांना खडे बोल सुनावत म्हटलं, 'तुम्हाला
लाज वाटली पाहिजे. हे पाहणं खूप वाईट आहे की कोणीतरी देशातील उत्कृष्ट काम
करणाऱ्या व्यक्तीच्या कामाला निरुपयोगी म्हणतंय. थोडी मर्यादा पाळायला शिका. दिलीप
कुमार यांनी अनेक सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटातही काम केलं आहे.'
यासोबत
उर्मिलाने पुढे म्हटलं, 'दिलीप कुमार यांनी कारगिल
युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या पत्नींसाठी मदत केली होती. याशिवायही त्यांनी
अनेक सामाजिक कामं केली आहेत. तुम्ही तुमच्या विचारांनी देशाची विभागणी करताय.
दिलीप कुमार कधी धर्मात अडकले नाहीत. अनेक मुसलमान व्यक्तींनी हिंदू नावं ठेवली तर
त्यात काय झालं? तुम्ही मनाने भारतीय असणं जास्त महत्वाचं
असतं.' असं म्हणत उर्मिलाने अरुण यांना सुनावलं आहे.
0 टिप्पण्या