लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव /बालमटाकळी :बालमटाकळी सारख्या ग्रामीण भागात मयुर वैदय या
तरुणाने शिवरंग अॅग्रो हा अत्याधुनिक गुळ निर्मिती प्रकल्प उभारून तरुणापुढे आदर्श
निर्माण केला आहे. असे प्रतिपादन आमदार रोहीत पवार यांनी केले.
काल बालमटाकळी येथील मयुर
वैदय यांच्या शिवरंग अॅग्रो प्रोडॅक्ट या गुळ निर्मिती कारखान्यास आमदार रोहीत
पवार यानी भेट देवून शिवरंग अॅग्रो या वेबसाईटचे उदघाटन केले. यावेळी
शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले,सावता परिषदेचे
प्रदेशाध्या कल्याण आखाडे, राष्ट्रवादीचे जेष्ट नेते का
काकासाहेब नरवडे, बालम टाकळीचे सरपंच तुषार वैदय,गुळ उदयोग समुहाचे संचालक रंगाभाऊ वैदय, डॉ दिपक
वैदय,राष्ट्रवादीचे युवक जिल्हा अध्यक्ष संजय कोळगे,युवा नेते संतोष पावसे, व्यंकटेश मल्टी स्टेटचे
व्हाईस चेअरमन व्यंकट देशमुख,हातगावचे सरपंच अरूण मातंग,
कांबीचे सरपंच नितीश पारनेरे,मोहनराव देशमुख,
रामनाथ राजपुरे, नितीन भोंगळे,इत्यादी सह परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत
होते.
यावेळी
पुढे बोलतांना आ.पवार म्हणाले की मयुर वैदय यांना उद्योग व्यवसायासाठी अडचणी
आल्यास त्यांना सर्वतोपरी मदत करु. वैदय यांना बऱ्याच दिवसापुर्वी शब्द दिला होता.
आज येथे येवून तो शब्द पाळला. आंम्ही दिलेला शब्द पाळणारे मानसं आहोत. गुळाचा
येवढा मोठा आणी स्वच्छ कारखाना पाहुन आनंद वाटला. वैदय यांनी या उद्योगातुन
तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे. त्यामुळे मयुर वैदय कौतूकास पात्र आहेत. यावेळी
सावता परिषदेचे प्रमुख कल्याण आखाडे, उद्योग समुहाचे संचालक मयुर वैदय रंगाभाऊ वैदय,
डॉ. दिपक वैदय यांनी स्वागत केले तर आभार उपसरपंच तुषार वैदय यांनी
मानले.
0 टिप्पण्या