Ticker

6/Breaking/ticker-posts

अखेर.. स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांचे मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन

 

*स्वप्नील लोणकर या तरुणाच्या कुटुंबीयांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

* लोणकर याच्या बहिणीला नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार- डॉ. नीलम गोऱ्हे.







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने निराश होऊन आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर या तरुणाच्या कुटुंबीयांनीकाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत.. काळजी करू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांना धीर दिला व मदतीचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या लोणकर कुटुंबीयांमध्ये स्वप्नील लोणकर यांची आई, वडील आणि बहीण यांचा समावेश होता.


या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर आणि सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे उपस्थित होते. या वेळी स्वप्नील लोणकरची बहीण पूजा हिला नोकरी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

शिवसेनेतर्फे ११ लाखांची आर्थिक मदत
काल राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, आमदार महेश शिंदे आणि तानाजी सावंत यांनी पुण्यातील हडपसर येथील लोणकर कुटुंबीयांच्या घरी भेट देत त्यांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेनेच्या वतीने ११ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

शिवसेना तुमच्या सोबत आहे, तुम्ही धीर सोडू नका, अशा शब्दात शिवसेनेच्या नेत्यांनी लोणकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. स्वप्नीलची बहीण पूजा लोणकर हिने शिक्षण पूर्ण केले असल्यास आणि तिची नोकरी करण्याची ईच्छा असल्यास तिला नोकरीही मिळवून देऊ असे आश्वासनही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लोणकर कुटुंबीयांना दिले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या