Ticker

6/Breaking/ticker-posts

रुपाली चाकणकरांच्या 'त्या' टीकेवर नवनीत राणां म्हणाल्या...

 


लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अमरावती : राज्यात झालेल्या दोन दिवसाच्या अधिवेशनात भाजपचे आमदार रवी राणा यांनी अध्यक्षांचा राजदंड पळवला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर टीका केली होती. ' बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले' असे ट्विट रूपाली चाकणकर यांनी केले होतं. त्यावर आज खासदार नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.


रुपाली चाकणकर यांच्या टीकेबद्दल विचारलं असता, 'मी रुपाली चाकणकर यांना ओळखत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. मी शरद पवार आणि अजित पवार यांना ओळखते. मी त्यांचा मानही राखते. त्यामुळे माझं काही चुकत असेल तर ते मला मार्गदर्शन करतील. पण ज्यांना मी ओळखत नाही अशांबद्दल मी काहीही बोलू शकत नाही' असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत. त्या अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.

दरम्यान, राज्यात झालेल्या दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनामुळे राजकीय चर्चांना आणि आरोप-प्रत्यारोपांच्या उधाण आलं. अशात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणावरून वातावरण पेटलं. यावेळी भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आलं. हे कमी होते की काय म्हणून अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीही विधानसभेत मोठा गोंधळ झाला. यावेळी भाजपचे आमदार रवी राणा यांनी थेट अध्यक्षांचा राजदंड पळवला यावरून तालिका अध्यक्ष यांनी त्यांना सभागृहात बाहेर काढण्याचे आदेश दिले होते.

याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी टीका केली होती. रवी राणा यांनी राजदंड पळवला तर पत्नी खासदार नवनीत राणा यांनी खोटं जात प्रमाणपत्र दाखवलं यावर चाकणकर यांनी ट्वीट करत दोघांवर गंभीर टीका केली होती.

त्यांनी ट्वीटमध्ये लिहलं होतं की, 'बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले' त्यांच्या या टीकेवर नवनीत राणा यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या