*नवाब मलिक यांनी शेअर केला भाजप आमदारांच्या राड्याचा व्हिडिओ
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी
आरक्षणाचा ठराव मंजुर होत असताना अभूतपूर्व गोंधळ झाला. तालिका अध्यक्ष भास्कर
जाधव यांच्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात
आलं. यानंतर निलंबित १२ आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात राडा घातल्याचं
समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री
नवाब मलिक यांनी याचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे.
निलंबन झाल्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांना
भेटण्यासाठी गेले असता भाजपच्या आमदारांनी मोठा गोंधळ घातला आणि उपाध्यक्षांच्या
दालनात राडा घातला. याचा एक व्हिडिओ ट्वीट करत नवाब मलिक यांनी भाजवर निशाणा साधला
आहे.
एकीकडे राज्यात कोरोनाचं सावट असताना
गर्दी करण्यास बंदी आहे. तर दुसरीकडे भाजपच्या आमदारांनी धक्काबुक्की करत मोठ्या
प्रमाणात उपाध्यक्षांच्या दालनात गर्दी केली. त्यामुळे कोरोनाचा विसर या नेत्यांना
पडला आहे का? असा सवाल
यावरून उपस्थित होतो.
दरम्यान, यामध्ये आशिष शेलार, गिरीश महाजन, जयकुमार रावल, संजय
कुटे या माजी मंत्र्यांचाही समावेश आहे. यामुळे आक्रमक पवित्रा घेत सर्व निलंबित
आमदार हे राज्यपाल कोश्यारींची भेट घेणार असल्याची माहिती आहे. अधिक माहितीनुसार,
सर्व निलंबित आमदार हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार
असून ते काय मागणी करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, निलंबित
आमदारांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका आहे. सभागृहात भाजपचं बहुमत नसावं यासाठी
१२ आमदारांना निलंबित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलं आहे. इतकंच नाहीतर हा
ठरवून रचलेला प्लॅन आहे. सभागृहामध्ये असा कोणताही गोंधळ झाला नाही, असं आमदारांचं म्हणणं आहे.
पावसाळी
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाचा ठराव मंजुर होत असताना अभूतपूर्व
गोंधळ झाला. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी
भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आलं. यानंतर निलंबित १२ आमदारांनी विधानसभा
उपाध्यक्षांच्या दालनात राडा घातल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे
राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी याचा एक व्हिडिओ ट्वीट
केला आहे.
निलंबन झाल्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांना
भेटण्यासाठी गेले असता भाजपच्या आमदारांनी मोठा गोंधळ घातला आणि उपाध्यक्षांच्या
दालनात राडा घातला. याचा एक व्हिडिओ ट्वीट करत नवाब मलिक यांनी भाजवर निशाणा साधला
आहे.
एकीकडे राज्यात कोरोनाचं सावट असताना
गर्दी करण्यास बंदी आहे. तर दुसरीकडे भाजपच्या आमदारांनी धक्काबुक्की करत मोठ्या
प्रमाणात उपाध्यक्षांच्या दालनात गर्दी केली. त्यामुळे कोरोनाचा विसर या नेत्यांना
पडला आहे का? असा सवाल
यावरून उपस्थित होतो.
0 टिप्पण्या