Ticker

6/Breaking/ticker-posts

साहित्य संमेलन तूर्त तरी अशक्य,- पालकमंत्री छगन भुजबळ

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


नाशिक: करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लांबणीवर पडलेले नाशिकमधील नियोजित ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लाट ओसरल्यानंतर घेण्याची तयारी संयोजकांनी केली असली तरी पालकमंत्री छगन भुजबळ   यांनी मात्र आयोजकांना झटका दिला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आम्ही ओबीसी आंदोलन थांबविले असल्याचे सांगत, साहित्य संमेलनही तूर्त तरी आयोजित करणे अशक्यच असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

नाशिकमध्ये नियोजित ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मार्चमध्ये होणार होते. परंतु, करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सदरचे संमेलन स्थगित करण्यात आले होते. करोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे संमेलन घेण्याच्या हालचाची सुरू झाल्या होत्या. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी पालकमंत्री भुजबळांनी पत्र पाठवून संमेलन होणे शक्य आहे का आणि तारीख कळवा, असे पत्र पाठवले आहे. त्यावर भुजबळांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

करोनाच्या दुसऱ्या लाटेतून नाशिककर आता कुठे सावरत आहेत. त्यात पुढील महिन्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जाते आहे. त्यामुळे गर्दी होण्याचा धोका आहे. संमेलनामुळे हजार-दोन हजार व्यक्ती एकत्र येतील आणि ते सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही. गर्दी टाळण्यासाठी आम्हीदेखील ओबीसी आंदोलन थांबवले आहे. त्यामुळे तूर्तास तरी साहित्य संमेलन आयोजित करणे अशक्य असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आयोजकांना मोठा झटका बसला असून, संमेलन आता पुन्हा लांबणीवर पडले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या