लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नुसार, पुणे महापालिकेतील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक
संस्था यांचे नियमित वर्ग दिनांक 31 जुलै 2021 पर्यंत पूर्णतः बंद राहतील. मात्र, ऑनलाईन
शिक्षणासाठी मुभा देण्यात आलेली आहे. हे आदेश पुणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या
पुणे कटक मंडळ व खडकी कटक मंडळ यांना देखील लागू असणार आहेत.
दरम्यान, इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या
नागरिकांसाठीही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे लसचे दोन डोस घेतले आहेत अशा
नागरिकांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे, असे टोपे
यांनी सांगितले. यापूर्वी राज्यात प्रवेश देताना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पाहिला
जात होता मात्र आता करोनाच्या दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र पाहूनच राज्यात प्रवेश
दिला जाईल, असे टोपे म्हणाले. राज्यातील ९२ टक्के रुग्ण दहा
जिल्ह्यांमध्ये आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर,
सातारा, सांगली, अहमदनगर,
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे रुग्ण अधिक आहेत,
असेही टोपे यांनी नमूद केले.
0 टिप्पण्या