Ticker

6/Breaking/ticker-posts

२४ जुलै रोजी लातूर येथे ओबीसी व्हिजे एनटी जनजागृती अभियान -बाळासाहेब सानप





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


लातुर - येत्या शनिवार दिनांक २४-०७-२०२१ रोजी लातूर येथे होणार्या ओबीसी व्हिजे एनटी जनजागृती अभियानास सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे  असे आवाहन जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केले आहे.

आज लातूर येथे आयोजित बैठकीत त्यांनी मोजक्या ओबीसी बंधवांशी संवाद साधला यावेळी त्यांनी वरील आवाहन केले.

 बैठकीत लातूर येथे ओबीसी समाज बांधवांशी ओबीसी व्हीजे एनटी जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप  यांनी अभियाना विषयी चर्चा केली व जनजागृती अभियाना चे नियोजन करण्यात आले. 

 यावेळी उपस्थित ओबीसी नेते अँड श्री आण्णाराव पाटील, मा महापौर श्री विक्रांत गोजमगुंडे साहेब लातूर,ओबीसी नेते धनंजय बेडदे, राजा मनीयार, ओबीसी नेते श्री बाळासाहेब पांचाळ ,व अनेक ओबिसी संघटनेतील नेते उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या