*आर्थिक राजधानी कराचीमध्ये बाधितांची संख्या वाढली
*करोना डेल्टा वेरिएंटचा मोठा संसर्ग
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
डेल्टा वेरिएंटचा वेगाने संसर्ग होत
असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सिंध प्रांत सरकारने म्हटले की, नागरिकांनी खबरदारी न घेतल्यास
परिस्थिती गंभीर होऊ शकते. सिंध प्रांताची राजधानी कराचीमध्ये करोनाची बाधा
होण्याचा दर २५.७ टक्के इतका झाला आहे. हा पाकिस्तानच्या एकूण दरापेक्षा पाच पट
अधिक आहे. पाकिस्तानमध्ये करोनाबाधित आढळण्याचा दर ५.२५ टक्के आहे. पाकिस्तान
मेडिकल संघाचे महासचिव डॉक्टर कैसर सज्जाद यांनी सांगितले की, खासगीच नव्हे तर सरकारी रुग्णालयातही परिस्थिती वाईट आहे. या
रुग्णालयांमध्येही रुग्ण दाखल करून घेण्यास थांबवले जाऊ शकते.
कराचीतील सर्वात मोठे रुग्णालय जिन्ना
हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. सीमिन जमाली यांनी सांगितले की, रुग्णालयातील ९० पैकी ७७ खाटांवर रुग्ण आहेत.
करोनाबाधितांसाठी रुग्णालयात आणखी खाटांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या वेळी परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. ईद उल अजहा आणि
पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका घेणे हे करोनासाठी सुपर स्प्रेडर ठरण्याची
शक्यता आहे. सिंध प्रांतात करोनाच्या संसर्गामुळे ५७५६ जणांचा मृत्यू झाला आहे.
0 टिप्पण्या