लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
श्याम तांबे आणि माया कांबळे असं या
नवदाम्पत्याचं नाव आहे. कैलास ब्रिगेड ही सामाजिक संस्था गेल्या पंचवीस वर्षापासून
कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रम राबविणारी ही संस्था जालना शहरातील रेल्वे
स्थानक मार्गावर आपुलकी बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून बेघरांना आधार
देण्याचे कार्य करीत आहे. या आपुलकी बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून ही संस्था
रागाच्या भरात निघून आलेल्या वृध्द व्यक्तींना आपुलकीने वागणूक देवून त्यांची
काळजी घेते.
आपुलकी परिवाराने या दृष्टीहीन जोडप्यांचा
आगळावेगळा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. आमदार कैलास गोरंट्याल यांनी या
नेत्रहीन जोडप्यांच्या विवाहासाठी मोलाचे सहकार्य केले. या दृष्टीहीन जोडप्यांच्या
विवाहासाठी पालकत्व स्वीकारण्याबाबत या संस्थेने आवाहनही केले होते. या आवाहनास
जालना शहरातील सामाजिक संस्थांनी प्रतिसाद देत शाम - मायाच्या संसारासाठी अनेक हात
पुढे आले. त्यामुळेच हा अनोखा विवाह सोहळा पार पडला.
0 टिप्पण्या