लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई : इंडियन आयडल १२ कार्यक्रमाच्या आगामी
भागामध्ये हिंदी सिनेमासृष्टीत ९० चे दशक गाजवलेली
अभिनेत्री करिष्मा कपूर सहभागी होणार आहेत. यावेळी सहा स्पर्धक आपल्या
गायनाचे कौशल्य तिच्यासमोर सादर करणार आहेत. यावेळी करिष्मा कपूरने तिच्या
करीअरमधील मजेशीर किस्से, आठवणी उपस्थितांना सांगितल्या.
इंडियन आयडल १२ कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य
नारायणने करिष्माला तिच्या सहकलाकारांबद्दल प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचे
उत्तर देताना करिष्माने सांगितले सुनील शेट्टी,अक्षय कुमार आणि आमिर खान यांच्या काही मनोरंजक
आठवणी सांगितल्या आहेत.
करिष्माने सांगितले की, 'हे तिघेजण अतिशय खोड्या काढण्यात माहिर
आहे. त्यामध्ये सुनील शेट्टी मस्करी करण्यात सगळ्यात आघाडीवर असायचा.' करिष्माने पुढे सांगितले, ' माझ्याबरोबर सुनीलने दोन
वेळा प्रँक केला होता. एका आम्ही चेन्नईला एका सिनेमाचे चित्रीकरण करत होते.
त्यावेळी चित्रीकरणाच्या ठिकाणी धोतर नेसलेला एक माणूस आमच्यापासून काही अंतरावर
बसला होता. त्याठिकाणी खूप लोक त्याला जाऊन भेटत होती. ती व्यक्ती कोण असेल,
याचा विचार मी करत होते. मला वाटले साऊथच्या सिनेमातील कुणी मोठा
कलाकार असेल. कदाचित मी त्यांना ओळखत नसेन.
त्याचवेळी अण्णाने (सुनील शेट्टी) मला
त्या व्यक्तीला जाऊन भेटायला सांगितले. त्याने सांगितले म्हणून मी त्या व्यक्तीला
जाऊन भेटले, बोलले इतकेच नाही तर मी त्याच्यासोबत फोटो देखील
काढले. हे सगळे २० मिनीटे सुरू होते... त्यानंतर मी पुन्हा माझ्या जागेवर येऊन
बसले. माझा शॉट येणार होता. त्यामुळे मी मेकअप करायला बसले, तेव्हा
तिच व्यक्ती येऊन माझा मेकअप करू लागली. त्याला पाहून मी आश्चर्यचकीत झाले. मी
मेकअप करायचा सोडून सुनीलकडे गेले आणि हे सगळे काय आहे असे विचारले... तेव्हा तो
आणि तिथे उपस्थित असलेले सगळे जण मोठ्याने हसू लागले... ते पाहून मला नेमके काय
झाले हे कळले नाही. त्यानंतर मला सुनीलने सांगितले की, हा
माझा मेकअपमन आहे.... आणि सगळ्यांनी मिळून माझी मस्करी केली होती...'
आणखी एकदा केला प्रँक
दानिशचे केले
भरभरून कौतुक
यावेळी
इंडियन आयडल १२ मधील स्पर्धकांनी करिष्मावर चित्रीत केलेली गाणी सादर केली.
मोहम्मद दानिशसाठी हा भाग खास होता. या भागामध्ये दानिशने 'यारो ओ यारा, मिलना हमारा'
आणि 'फूलों सा चेहरा तेरा' ही गाणी गायली. त्यानंतर करिष्माला त्याने स्टेजवर येऊन त्याच्यासोबत
डान्स करण्याची विनंती केली. करिष्माने देखील दानिशची ही विनंती मान्य केली.
दानिशने गायलेल्या 'आए हो मेरी जिंदगी में.. ' या गाण्यावर डान्स करत सारे वातावरण रोमँटिक करून टाकले होते... त्यानंतर
करिष्माने दानिशचे भरभरून कौतुक करत म्हटले की, 'तू उत्कृष्ट
गायक आहेस. तुझ्या गाण्यामुळे मी काही वर्षे मागे गेले आणि ते सुंदर दिवस पुन्हा
एकदा अनुभवले...'
करिष्मा कपूर आणि सुनील शेट्टी यांनी कृष्णा, रक्षक, गोपी-किशन,
सपूरत, बाज या सिनेमांत एकत्र काम केले आहे.
सुनील आणि करिष्माची ऑनस्क्रीन जोडी सगळ्यांना खूपच आवडली होती. सध्या आता करिष्मा
सिनेमांपासून दूर आहे. २०१२ मध्ये तिचा डेंजरस इश्क हा सिनेमा प्रदर्शित झाला
होता. त्यानंतर २०१३ मध्ये बॉम्बे टाईम्सच्या एका खास गाण्यामध्ये दिसली होती आणि
२०१८ मध्ये झीरो सिनेमात ती पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती. दरम्यान, अलिकडेच करिष्माने 'मेंटलहु़ड' या वेबसीरिजमधून ओटीटी जगतामध्ये पदार्पण केले होते.
0 टिप्पण्या