पुणे रोडवरील केडगाव जवळील चासच्या ओढ्यातील दत्तमंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त, लघु रुद्रा भिषेक दत्त चरित्र पारायण, विश्वकल्याणासाठी व कोरोनाचे संकट नष्ट होण्यासाठी होमहवन संपन्न झाला(छाया-महेश कांबळे )
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर -गुरुपौर्णिमाच्या दिवशी गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुवंदना करतो.मात्र कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही एकत्रीकरणावर प्रतिबंध असल्याने सर्वत्र मर्यादीत स्वरुपात कार्यक्रम संपन्न झाले. येथील पुणे रोडवरील केडगाव जवळील चासच्या ओढ्यातील दत्तमंदिरात मर्यादित स्वरूपात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी लघुरुद्राभिषेक, दत्त चरित्र पारायण, विश्वकल्याणासाठी व कोरोनाचे संकट नष्ट होण्यासाठी होमहवन संपन्न झाला.प्राचीन असलेल्या व राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात प्रतिवर्षी विविध स्वतंत्र कार्यक्रम संपन्न होतात.परंतु यावर्षी सर्व भक्त मंडळीनी एकत्रितपणे परंतु मर्यादित स्वरुपात कार्यक्रमाचे आयोजन केले.दुपारी आरती नंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.
भाविक दर्शनासाठी येत होते, दत्तभक्तांसाठी हा पूण्यपावन दिवस असून या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपचारे पूजा करतो.आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पूढील वाटचालीसाठी आशिर्वाद घेतो.वेगवेगळ्या पंथ व संप्रदाय हा इश्वरभक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे मुमुक्षु-पारमार्थिक या दिवशी भक्तीभावाने गुरुंचे पूजन करतात व गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करतात.
खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सदगुरुंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द चालवणे म्हणजे खरे गुरुपूजन ! गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो - गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥
0 टिप्पण्या