*मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क
गुरुवारी
झालेल्या मुसळधार पावसानंतर रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात मिळून एकूण ५ ठिकाणी दरड
कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. महाड तालुक्यातील तळीये गावात भीषण दरड कोसळून ३६
जणांचा मृत्यू झाला आहे. तळीयेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. राज्यभरात
पावसाचा जोर आहे. अनेक ठिकाणी लोक पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या १२९ वर पोहोचली आहे, अशी
माहिती थोरात यांनी दिली आहे.
राज्यात ८९
मृत्यू
दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनांमुळे आज
दिवसभरात राज्यात एकूण आतापर्यंत ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरी
जिल्ह्यातील चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटलमधील कोव्हिड सेंटरमध्ये असलेल्या ८
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर रायगड तालुक्यातील महाड तालुक्यातील तळीये येथे दरड
कोसळून ३८ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील आंबेघर येथे १२
जणांचा मृत्यू झाला असून वाई येथे २ महिलांचा मृत्यू झाला आहे.
तसेच
रायगडमधील पोलादपूर येथे ११ जणांचा मृत्यू झाला असून रत्नागिरीतील खेड तालुक्यातील
पोसरे येथे दरड कोसळून एकूण १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सिंधुदुर्ग
जिल्ह्याील कणकवली तालुक्यातील दिगवळे येथे एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील कालचे
मृत्यू
रत्नागिरी- २५ मृत्यू
रायगड- ५९ मृत्यू
रत्नागिरी- २५ मृत्यू
सिंधुदुर्ग- १ मृत्यू
सातारा- १४ मृत्यू
मृतांच्या
वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत
राज्यात दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी
पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी केली
आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल,
असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
0 टिप्पण्या