लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर – भाजपचे निष्ठावान नेते दिलीप गांधी यांच्या निधनाची बातमी धक्कादायक होती. त्यांच्या निधनानंतर गांधी परिवारास भेटण्यास येणार होतो, मात्र करोनाच्या गंभीर लाटेमुळे येवू शकलो नाही. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत झालेली त्यांची भेट अंतिम ठरली. आयुष्यभर पक्षाचे चांगले काम करणारे दिलीप गांधी यांच्या निधाने दु:ख झाले असल्याच्या भावना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.
आ.चंद्रकांत पाटील यांनी काल सकळी स्व.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट देवून गांधी परिवाराचे सांत्वन केले. श्रीमती सरोज गांधी, सुवेन्द्र गांधी, देवेंद्र गांधी व अनिल गांधी यांच्याशी आ.चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. यावेळी भाजपचे प्रा.भानुदास बेरड, भैय्या गंधे, वसंत लोढा, सुनील रामदासी आदी जेष्ठ नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या