Ticker

6/Breaking/ticker-posts

पंकजा मुंडे यांना धक्का! वैद्यनाथ साखर कारखान्यावर कारवाई

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

औरंगाबाद: भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील पांगरी (जि. बीड) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) विभागाने कारवाई केली. कामगारांच्या हक्काचे पीएफ थकविल्या प्रकरणी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाने कारवाई करत ९२ लाखांची वसूली केली. उर्वरित रक्कम वसुलीसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कारखान्याने मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ कालावधीतील पीएफचा भरणा केला नव्हता. पीएफपोटी थकीत रक्कम १ कोटी ४६ लाख रुपये आहे. त्यामुळे थकीत रक्कम वसुली सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी वसुली नोंदवली. उर्वरित रक्कम वसुलीसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सर्व भविष्य निधी थकबाकीदारांनी थकीत थकीत भविष्य निधी देयकांचा भरणा त्वरीत करावा, असे आवाहन क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे.

आशिया खंडात नाव गाजलेला हा साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आहे. पगार न मिळाल्यामुळं कारखान्यातील ७०० कामगारांनी मागील मार्च महिन्यात बंद पुकारला होता. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही कर्मचाऱ्यांनी थकीत पगारासाठी अनेक दिवस आंदोलन केले होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या