Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर दक्षिणेत ना.शंकरराव गडाखांच्या अध्यक्षतेखाली उद्यापासून शिवसंपर्क अभियान











लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर: मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली नगर दक्षिण जिल्ह्यामध्ये शिवसेना संपर्क मोहीम लक्ष २०२२ हे अभियान १२ जुलै ते २४ जुलै या दरम्यान राबविण्यात येत अस्ल्याची माहिती जिल्हाप्रसिद्धीप्रमुख प्रविण अनभुले यानी दिली. शेवगाव- पाथर्डीत शिवसेना तालुकाप्रमुख अंकुशभाऊ चितळे यांच्या नेत्रुत्वाखाली वेळापत्रक जाहिर करुन या अभियानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतील या अभियानाची माहिती देण्यासाठी त्यानी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांशी संवाद साधुन सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना पक्ष बळकटीकरणाचे आदेश दिले. शिवसेना पदाधिकार्यानी युती किंवा आघाडीची चिंता करू नका, कामाला लागा,  असे आवाहन ठाकरे यांनी नुकतेच  केले होते, त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात उद्यापासून ना.शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना समनवयक मा.विश्वनाथ नेरुळकर, शिवसेना संपर्कप्रमुख मा.संजय घाडी, शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. विजय पाटील तसेच विधानसभा संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मोहीमस नगर जिल्ह्यमध्ये उद्यापासून सुरू होत आहे.

पाथर्डी आणी शेवगाव या तालुक्यात शिवेसना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिवसेना तालुकाप्रमुख अंकुशभाऊ चितळे यांचा नेत्रुत्वाखाली  उपतालुकप्रमुख विभाग प्रमुख उपविभागप्रमुख तसेच शाखाप्रमुख, महिला आघाडी, जिल्हा संघटक, उपजिल्हासंघटक, तालुका संघटक, शहर संघटक, युवासेना, विधानसभा संघटक,तालुका संघटक, उपतालुका संघटक , सर्व पदाधिकारी आणि शाखा प्रमुख यांच्या उपस्थितीत सदरचे कार्यक्रम प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये आयोजित करण्यात आले आहेत.

 सदरच्या दौऱ्यात कोरोना संदर्भात सर्व खबरदारी घेऊन ५०  पदाधिकार्यांच्या उपस्थितीत प्रत्येक पंचायत समिती गणात हा कार्यक्रम होणार आहे. गावातील प्रभाग निहाय शाखाप्रमुख, शाखा संघटिका, युवासेना शाखासंघटक, बूथ प्रमुख नेमणुका करणे , कार्यकर्त्यांच्या याद्या तयार करणे, तालुकानिहाय आणि पंचायचसमिती गणनिहाय जनतेची अपेक्षित कामे करणे, अधिकाधिक गावांमध्ये पोहोचत लोकांशी संपर्क वाढविणे,  शिवसेनेच्या जेष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करणे, त्यांच्या अडचणी वरिष्ठ नेत्यापर्यंत पोहचविणे व महाविकास आघाडी सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोत आहेत की नाही याची खातरजमा करण्यावर या अभियानात भर दिला जाणार आहे. मनपा, नगर परिषद,नगर पंचायतीच्या प्रभागात देखील सदरचा कार्यक्रम खालील वेळापत्रकानुसार राबविला जाणार आहे, असे शिवसेना तालुकाप्रमुख अंकुशभाऊ चितळे यानी सांगितले.

 

 शिवसंपर्क अभियान कार्यक्रम -

(दिनांक १२ जुलै ते २४ जुलै २०२१)

 

            दिनांक १६ जुलै- सकळी ११ वाजता पाथर्डी शहर (शेवगाव  आणी पाथर्डी)  

            दिनांक १७ जुलै- सकाळी १० वाजता माणिकदौडी,

`-दुपारी १ वाजता टाकळी मानूर,

-दुपारी ४ वाजता अकोला


दिनांक १८ जुलै- सकाळी १० वाजता भालगाव,

-दुपारी १ वाजता कोरडगाव

-दुपारी ४ वाजता माळीबाभळगाव

 

        दिनांक १९ जुलै -सकाळी १० वाजता मिरी

    -दुपारी १ वाजता करंजी

    -दुपारी ४ वाजता तिसगाव

 

        दिनांक २० जुलै -सकाळी १० वाजता कासार पिंपळगाव 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या