*रमजाननंतर जवळपास दोन महिन्यानंतर बकरी ईद
*मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, राज्यपालांसह दिग्गजांकडून ‘ईद-उल-अजहा’
च्या शुभेच्छा
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई : मुस्लिम
बांधवांसाठी पवित्र असलेल्या‘ईद-उल-अजहा’ म्हणजेच बकरी
ईदचा सण आज देशभरात
उत्साहाने साजरा केला जात आहे. मुस्लिम समाजामध्ये कुर्बानीला मोठं महत्व असून
त्यासाठीच आजचा दिवस साजरा केला जात आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, रमजाननंतर जवळपास दोन महिन्यानंतर बकरी
ईद साजरी
केली जाते. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,
राज्यपालांसह दिग्गजांकडून ‘ईद-उल-अजहा’
च्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
परस्परांविषयी आदर बाळगूया-मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ईद-उल-अजहा’
अर्थात बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना विषाणू
प्रादुर्भावाचे संकट रोखण्यासाठी हा सण घरीच राहून साजरा करा, यातून आपले कुटुंबीय आणि परस्परांची काळजी घ्यावी, असे
आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले आहे. ‘ ईद-उल-अजहा’
त्याग, समर्पणाचा संदेश देणारा आहे. त्यातून
प्रेरणा घेऊन आपण परस्परांविषयी आदर बाळगूया,’ असेही
मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.
‘बकरी ईद’ हा पवित्र सण श्रद्धा, प्रेम, बंधुभाव व त्यागाचा संदेश देतो -राज्यपाल
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना ‘बकरी ईद’ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बकरी ईद’ हा पवित्र सण श्रद्धा, प्रेम, बंधुभाव व त्यागाचा संदेश देतो. हा सण
साजरा करताना सेवाकार्य तसेच उपेक्षित जनसामान्यांच्या कल्याणाचा विचार केला जातो,
ही अतिशय समाधानाची बाब आहे. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत
सर्वांनीच गोरगरीब बांधवांच्या हिताचा विचार करणे आवश्यक झाले आहे. बकरी ईदनिमित्त
मी राज्यातील सर्व लोकांना विशेषतः मुस्लिम बंधू – भगिनींना
हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी
यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
0 टिप्पण्या