लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथे सुरू असलेल्या
कुंटनखान्यावर शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. या वेळी एका महिलेसह दोन
ग्राहकांना ताब्यात घेतले. या कारवाईत कुंटनखान्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या सात
महिलांची सुटका करून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
विशाल गोविंद आडे (वय २६, रा. विश्रांतीनगर, मुकुंदवाडी) आणि मोनु गयाप्रसाद सागर (वय २८, रा.
भगतसिंगनगर, हर्सुल) या दोन ग्राहकांना पोलिसांनी पकडले असून,
सात हजार ८० रुपये जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक
मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. कारवाईत कुंटनखाना चालविणारी
महिला गिता उर्फ आशा कदमसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव कोल्हाटी परिसरात कुंटनखाना सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना मिळाली होती. यानंतर त्यांनी पथकाद्वारे वडगाव परिसरात सापळा रचून माहितीची खातरजमा करण्यासाठी एका बनावट ग्राहकाला तेथे पाठवले. तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पाहून ग्राहकाने पोलिसांना इशारा केला. यानंतर त्वरित कारवाई करण्यात आली. कुंटनखाना चालविणाऱ्या महिलेसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या ठिकाणी सात महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. पोलिसांनी सर्व महिलांची सुटका करून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात केली आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर सावंत करीत आहेत.
0 टिप्पण्या