Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रकल्पग्रस्तांचे हित महत्त्वाचेच परंतु ,दिरंगाई झाल्यास निधी जाण्याची भीती -खा.डॉ. सुजय विखे पाटील



(







अहमदनगर येथे नगर -करमाळा महामार्गाच्या भुसंपादन आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना खा. विखे पा.

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


अहमदनगर,: अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी न भूतो न भविष्यती असा भरघोस निधी राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी  उपलब्ध करून दिला आहे.  अहमदनगर जिल्ह्याचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेता जिल्ह्यातून नगर करमाळा , अहमदनगर बायपास, उड्डाण पुल, असे महत्त्वाचे आणि मोठे प्रकल्प होत आहेत.  नगर करमाळा नॅशनल हायवे क्रमांक 516 या रस्त्याच्या भूसंपादन बाबत नगर तालुक्यामधील प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी गांभीर्याने घेऊन तातडीने मार्ग काढला पाहिजे ,अशा सूचना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी संबंधित विभागांना दिल्या. 

अहमदनगर येथे नगर -करमाळा महामार्गाच्या भुसंपादन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी हायवे अथोरिटी ऑफ इंडियाचे प्रकल्प आधिकारी दिवान, प्रांतधिकारी श्रीनिवास, भूमिअभिलेख अधीक्षक पोळ ,तालुका कृषी अधिकारी  नवले,नगर रचना कार्यालयाचे अधिकारी  निकम,एम आय डी सीचे   वाघ,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण  नादगौडा, जिल्हा परिषद पाणी पुरवठा अधिकारी खताळ, राठोड, वाईकर, तारडे सहबाधित गावातील सरपंच,  ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

डॉक्टर विखे पाटील म्हणाले की, प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान सध्याच्या कोरोना संकटकाळात आहे. अशा वेळेस प्रकल्पग्रस्तांच्या काही अडचणीमुळे  भूसंपादन रखडले गेलं तर सदर प्रकल्प  कदाचित रद्द होण्याची भीती आहे .त्यामुळे प्रशासनाने कुठलीही दिरंगाई न करता भूसंपादना सारख्या संवेदनशील विषयांमध्ये बाधितांचे हित जपत समन्वय साधून  मार्ग काढण्याची आवश्यकता आहे.

प्रांताधिकार्‍यांनी नगर तालुक्यातील बाधित गावांमध्ये तातडीने शिबिरे घेऊन लोकांपर्यत  पोहोचवावेत व कायदेशीर दृष्ट्या  मार्ग काढून भूसंपादन करावे अशी सूचना त्यांनी दिली.  वाढीव मोबदला अथवा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी संदर्भात प्रांताधिकार्‍यांनी जातीने लक्ष घालुन त्या तात्काळ मार्गी लवण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या