*लातूर येथे ओबीसी आरक्षण मेळावा संपन्न
*मान्यवरांनी व्हिडिओ कॉन्फ्ररनसिंगच्या माध्यमातून साधला उपस्थितांशी संवाद
लातूर : आमचा कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाही, ज्याच्या त्याच्या हक्काचं ज्याला त्याला मिळाले पाहिजे , ही आमची स्पष्ट भूमिका आहे, तथापि आमच्यावर अन्याय झालेला सुद्धा आम्ही सहन करणार नाही, तेव्हा सरकारने ओबीसींच्या आरक्षणावर जी गदा आणली आहे हे सर्वस्वी अन्यायकारक असून आमच्या हक्काचं असलेलंआरक्षण कायम ठेऊन लोकसंख्येनुसार आरक्षण मिळालेच पाहिजे,त्यासाठी आंदोलनाची ही पेटलेली मशाल तोपर्यंत थांबणार नाही असा ईशारा ओबीसी नेते राज्याचे मंत्री विजयजी वड्डेटीवार यांनी दिला.
ओबीसी व्हीजेएनटी आरक्षण बचाव समितीचे समन्वयक नेते बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली आज लातूर येथे आयोजित जागर मेळाव्याची मशाल ना.विजयजी वड्डेटीवार यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फ्ररनसिंगच्या माध्यमातून मशाल प्रज्वलीत करण्यात आली, यावेळी ते उपस्थित ओबीसींना मार्ग दर्शन करताना बोलत होते.
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज लातूरला मेळावा पार पडला. कॉन्फ्ररनसिंगच्या माध्यमातून ओबीसी नेत्या पंकजाताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मेळाव्यास मार्गदर्गशन केले.
मेलव्याचे निमंत्रक बाळासाहेब सानप ,कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.अण्णाराव पाटील व उदघाटक म्हणून व सर्व मान्यवर, समाज बांधवाच्या हस्ते ओबीसीची जागर मशाल पेटविली. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत तोपर्यंत ही मशाल विझणार नाही. राज्यभरातून मेळाव्यासाठी सर्वपक्षीय नेते, ओबीसी संघटनांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला आहे.
0 टिप्पण्या