Ticker

6/Breaking/ticker-posts

..म्हणून एका दिवसात लोणावळ्यातील पर्यटन स्थळे पडली ओस..!

 




*जमावबंदीचे आदेश

*प्रमुख पर्यटनस्थळे निर्मनुष्य

*पर्यटनाचा आनंद लुटता न आल्याने अनेकांचा हिरमोड

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 लोणावळा:  निर्बंध असतानाही लोणावळा, खंडाळा आणि मावळातील पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी होत होती. या गर्दीमुळे वाढणारा करोनाचा धोका लक्षात घेत राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हाधिकारी यांनी लोणावळा व मावळातील पर्यटनस्थळे व परिसरात शुक्रवारी जमावबंदीचे आदेश दिले. या आदेशाची शनिवारी पोलिस व लोणावळा पालिका प्रशासनासह सबंधित ग्रामपंचायतींनी काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याने लोणावळा व मावळातील सर्वच प्रमुख पर्यटनस्थळे निर्मनुष्य झाल्याने ओस पड्ल्याच पाहायला मिळालं.


पोलिसांनी पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास मज्जाव केल्याने माघारी फिरलेल्या पर्यटकांनी लोणावळ्यात गर्दी केली होती. पर्यटकांच्या वाहनांमुळे जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर लोणावळ्यात वाहतूक कोंडी झाली. पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या भुशी धरण व टायगर, लायन्स, शिवलिंग पॉईंट्सकडे जाणाऱ्या मार्गावर लोणावळा धरणाजवळील नौसेना बाग येथे चेकनाका उभारण्यात आला आहे. या परिसरात शहर पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या ठिकाणाहून वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांना पुन्हा माघारी पाठवण्यात येत होते.

लोणावळा खंडाळयानंतर पर्यटकांचे मावळातील आकर्षणाचे ठिकाण असलेल्या कार्ला लेणी, एकविरा देवी मंदिर, भाजे लेणी, भाजे लेणी धबधबा, लोहगड, विसापूर, तिकोना, तुंग व राजमाची गड-किल्ले, पवनाधरण व परिसरातील दुधीवरे खिंड, प्रती पंढरपूर दुधीवरे या पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर ग्रामीण पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या