लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
टाकळीमानुर :कोरोनामुळे शहरेच प्रभावित झाली असे नाही तर ग्रामीन भागतही मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव वाढला म्हणून सुरक्षिततेसाठी आज पर्यंत आलो नाही ,मनात प्रचंड अस्वस्थता होती सगळ्यांना भेटण्याची इच्छा आहेच पण काही निर्बंध स्वतःहून घालून घेतले आणि शांत बसलो परंतु आता आपल्या सगळ्यांना यावर मात करण्यासाठी नियमाचे पालन करावे लागेल, चला दीड वर्षात विकास कामांना संथ गती मिळाली पण मात आघाडी सरकारने त्यास मान्यता दिली असून तुम्ही फक्त प्रस्ताव पाठवा मी मंजुरी आणतो ,असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड . प्रतापराव ढाकणे यांनी केले.
ढाकणे यांनी नुकतीच पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील वडगाव ,जोगेवाडी, चिंचपूर पांगुळ, मानेवाडी ,ढाकणवाडी परिसराचा सांत्वनपर दौरा करून ग्रामस्थांशी संवाद साधला .
काय करायचं यावेळी विविध गावातील ग्रामस्थांनी जोगेवाडी ते पाटसरा रस्ता दुरुस्ती करणे ढाकणवाडी घाटातील रस्ता रुंदीकरण करणे दुरुस्ती करण्याची नवल पांगुळ ते वडगाव रस्ता दुरुस्ती करणे मानेवाडी येथील अंतर्गत पाणीपुरवठ्याची पाईप लाईन संदर्भात तक्रारी मांडल्या व त्या सोडविण्याच्या मागण्या केल्या .
यावर बोलताना ढाकणे म्हणाले की , या परिसराचे माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्यावर प्रेम आहे ,तेच तुम्ही मला दिले . तुमचे उपकार मी विसरू शकत नाही त्यामुळेआलो आहे . मानेवाडी ,लाखनवाडी ,पांगुळ वडगाव ,जोगेवाडी गावातील मांडलेले प्रश्न राज्य सरकारच्या दरबारी पाठवणार आहोत .मंत्री धनंजय मुंडे पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवू अशी ग्वाही ढाकणे यांनी दिली .
यावेळी डॉ . राजेंद्र केरकर बडे, अशोक ढाकणे ,रावसाहेब ढाकणे, विष्णू ढाकणे ,आबासाहेब पांगरे ,आजिनाथ बडे ,लक्ष्मण पांगरे, डॉ . अशोक बडे ,सोमनाथ बडे ,दादासाहेब बारगजे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या