लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
चार जणांच्या उपस्थितीत लग्न करत सोनालीने चाहत्यांना आदर्श दिला. सोनालीच्या दुबईमधील घराची देखील चाहत्यांमध्ये चर्चा होती. लग्नाला दोन महिने पूर्ण झाले नाहीत तोच सोनाली पुन्हा एकदा कामावर रुजू झाली आहे. सध्या सोनाली जम्मू येथे आहे. तिथे सोनाली तिच्या आगामी प्रोजेक्टचं चित्रीकरण करत आहे. या चित्रीकरणासाठी सोनालीने पंजाबी मुलीचा पेहराव केला आहे. सलवार- कमीज आणि ओढणी मधील सोनालीचा देसी लुक भलताच भाव खाऊन गेला आहे. भारत- पाकिस्तान सीमेवर चित्रीकरण करत असलेल्या सोनालीने शेअर केलेले फोटो पाहून चाहते मात्र घायाळ झाले आहेत.
उंच वाढलेल्या पिकांमधील
फोटो शेअर करत सोनालीने तिला आपल्या देशाचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. सोनालीचे
हे फोटो चाहत्यांमध्ये वायरल झाले आहेत. यापूर्वी सोनालीच्या मिनीमूनचे फोटोही
सोशल मीडियावर चर्चेत होते. कधी निळ्याशार समुद्रकिनारी झोके घेताना तर कधी
पतीसोबत ट्रेकिंग करतानाचे फोटो सोनालीने चाहत्यांसोबत शेअर केले होते. लग्नानंतर
पुन्हा एकदा कामासाठी सज्ज झालेली सोनाली प्रेक्षकांसाठी काय नवीन घेऊन येतेय, याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागून राहिली
आहे.
0 टिप्पण्या