*पन्नासपेक्षा कमी सभासद
असणाऱ्या संस्थांनाच मुभा.
*इतर संस्थांच्या सभा तूर्त ऑनलाइनच होणार.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: राज्यात करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळणे आवश्यक असल्याने सहकारी
संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यास परवानगी देण्यात आली होती. आता याबाबत नवा आदेश जारी करण्यात
आला आहे. करोनाबाबत सर्व उपाययोजना करून आता ५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सर्व
सहकारी संस्थांना सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे आता वार्षिक सर्वसाधारण सभा
घेण्यास परवानगी असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.
पन्नासपेक्षा जास्त सभासद संख्या असलेल्या
सर्व सहकारी संस्थांनी व्हीसी अथवा ओएव्हीएमद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन
करावे. संस्थेच्या प्रत्येक सभासदास वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांक, वेळ, ठिकाण व ऑनलाइन लिंक याबाबतची माहिती किमान सात दिवस
अगोदर एसएमएस, मेल, व्हॉटसअॅपद्वारे
कळविण्यात यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. वार्षिक
सर्वसाधारण सभेची नोटीस संस्थेच्या नोटीस बोर्डवर, संस्थेच्या
शाखांची कार्यालये या ठिकाणी लावण्यात यावीत. तसेच ज्या सभासदांचे ई-मेल, पत्ता किंवा संपर्कासाठी मोबाइल क्रमांक नसेल अशा सभासदांना बैठकीत
चर्चेसाठी असणाऱ्या विषयांबाबतची माहिती सात दिवसांत पत्राद्वारे पोहोच करावी.
सर्व सहकारी संस्थांनी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबतच्या माहितीची जाहिरात
संस्थेचे कार्यक्षेत्र विचारात घेऊन, किमान एक स्थानिक
वर्तमानपत्र, एक जिल्हा वर्तमानपत्र किंवा राज्य दर्जा
असलेल्या
जाहिरातीत या बाबी हव्यात...
* वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित
करण्यासाठी व्हीसी किवा ओएव्हिएम (Other
Audio Visual Means) यापैकी कोणत्या माध्यमाद्वारे घेण्यात येणार
आहे.
*सभेचा दिनांक व वेळ.
*ज्या सभासदांनी आपला ई-मेल आयडी किंवा
मोबाइल क्रमांक याबाबतची माहिती संबंधित सहकारी संस्थेकडे नोंद केली नसेल
त्याबाबतची माहिती कोठे सादर करावी याबाबतचा तपशील नमूद करावा.
मराठीचा वापर
करण्याचा आग्रह
सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण
सभा या व्हीसी किंवा ओएव्हिएम (Other Audio
Visual Means) द्वारे घेण्यासाठी संबंधित सहकारी संस्थेने त्यांच्याकडे
उपलब्ध असणाऱ्या तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने अथवा एजन्सीची निवड करून
त्यांच्यामार्फत सभेचे कामकाज पार पाडावे. तसेच एजन्सीची निवड करताना मराठी
सॉफ्टवेअर वापरणाऱ्या एजन्सीचा प्राधान्याने विचार करावा. वार्षिक सर्वसाधारण सभेस
सदस्यांच्या उपस्थितीबाबत योग्य नोंद ठेवून सभेबाबतचे अभिलेख प्रचलीत तरतुदीनुसार
जतन करावे. या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून संस्थांनी आपल्या वार्षिक
सर्वसाधारण सभा घेण्याची कार्यवाही तात्काळ करावी, असे सहकार
विभागाने आदेशात नमूद केले आहे.
0 टिप्पण्या