*राज्य मंत्रिमंडळाची साहसी
पर्यटन धोरणास मान्यता.
*मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितला मेगाप्लान.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पर्यावरण
मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साहसी पर्यटन धोरण प्रत्यक्षात उतरले असून मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी
बोलताना आदित्य यांनी या धोरणामागील उद्देश स्पष्ट केला. राज्यात साहसी
पर्यटनाबाबत कोणतीच ठोस अशी नियमावली किंवा गाइडलाइन्स नव्हत्या. ही बाब लक्षात
घेऊन आम्ही हे पाऊल उचलले आहे. राज्यात पर्यटनाला प्रोत्साहन देत असताना त्यात
सुरक्षितता असणेही तितकेच गरजेचे असून या माध्यमातून आमचा तोच प्रयत्न असल्याचे
आदित्य यांनी नमूद केले. महाराष्ट्रात पर्यटन वाढवण्यासाठी हे नवं धोरण आणलं गेलं
असून जेव्हा कोविडचे निर्बंध शिथील होतील म्हणजेच पोस्ट कोविड काळात राज्यात
पर्यटन व्यवसाय भरारी घेईल. सर्वच प्रकारच्या पर्यटनात महाराष्ट्र आघाडीवर दिसेल, असा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या