Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा सहकारी बँकेचे एक लोकाभिमुख अधिकारी--भगवानराव पाटील ( खाटीक)

 

    शासकीय व्यवस्थेतील कर्मचारी म्हटले की बघतो, पाहतो ,करतो असे शब्द नेहमी सर्वसामान्याना ऐकायला मिळतात,  परंतु सरकार क्षेत्रात  आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवणारे,  जनतेशी बांधिलकी जपणारे,२४ तास सचिव,शेतकरी सभासदाच्या हाकेला प्रतिसाद देणारे,राजकारण विराहित कार्य करून विश्वास निर्माण करणारे, नेवासे तालुक्यातील सुलतानपुर येथील भगवान पाडुरंग पाटील साहेब( खाटीक) यांनी आपल्याला कामाने एक लोकाभिमुख अधिकरी म्हणून कार सेवाकाळ पूर्ण केला.

  श्री. पाटील हे जिल्हा बँकेतून ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले.  त्यांनी आपल्या कारकीर्दीत  क्लार्क, अकाउंट,  कार्यालयीन अधीक्षक अशी विविध पदे भूषविली आहेत.  जनतेशी नाळ असलेले पाटील साहेब स्वतः एक शेतकरी असल्याने शेतकर्‍यांच्या अडीअडचणीची त्यांना जाणीव होती. आपण एक अधिकारी नसुन आपण जनतेची सेवेकरी आहोत , ही भावना मनाशी त्यानी कायम ठेवल्याने सेवेतील आनंद हाच आयुष्यातील सर्वात मोठे समाधान असल्याचे ते आवर्जून सांगतात,सर्वसामान्यशी विनम्र पणे बोलणे, अडचणी समजून घेणे, यामुळे ते सचिव व शेतकऱ्यांचे एक आधार केंद्र बनले होते.    व्यवस्थापन - संशोधन व विकास विभाग त्यांनी कुकाणा, गेवराई, देवगाव,ज्ञानेश्वर कारखाना, शिरसगाव, नेवासे येथे प्रभारी तालुका विकास अधिकारी, म्हणून सेवा दिली.  

आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांनी आपुलकीची भावना व विश्वासाचे नात निर्माण केले. वरीष्ठ ते कनिष्ठ,  बँक ते  सर्वसामान्य यातील दुवा बनले. कोणी कधीही फोन करो ते सदैव २४ तास तत्पर राहून. बॅकेविषयी कामकाजाची माहिती,योजना,ते सर्वसामान्याना समजून सांगून न्याय देत. पगारापुरती नोकरी करायची नाही ,तर सर्वसामान्यची सेवा करायची ही भावना कायम त्यांनी मनात ठेवली होती. आपल्या कार्यातून कोणाचे वाईट होणार नाही, चागलेच काम होईल या वृतीने त्यांनी निःस्वार्थीपणे काम केले. 

सर्वसामान्य जनतेमध्ये जिल्हा बँकेच्या कार्यपद्धतीबद्दल एक विश्वास निर्माण केला.  २४ तास कार्यरत असणारे पाटील यांची उणीव सर्वसामान्यांना भासणार यात शंका नाही, सेवाभावी वृत्तीमुळे ते सर्व सामान्याचे लोकाभिमुख अधिकरी बनले. 

 सेवेच्या पुर्ण कालावधीबाबत ते समाधानी असून यापुढेही शक्य होईल तेवढी मदत करतच राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. आपल्या कारकीर्दीत कुणाचे मन दुखावले असेल तर आपण कायम ऋणाकित आहे ,अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.  

तर कुटुंबातील एक व्यक्ती सेवानिवृत्त होत आहे ,त्यांच्यातील उत्तम प्रशासकपणा व  मुदृसेवक म्हणून उल्लेखनीय कामगिरीचा कुटुंबाला सार्थ अभिमान आहे

 त्यांच्या या योगदानामुळे त्माजातील नाळ यापुढेही कायम  राहील .अशी अपेक्षा. तीन भाऊ,भावजयी,चुलते,पुतणे,एक  मुलगा, दोन मुली,अशी उच्च शिक्षण घेतलेली शेतकरी कुटुबव्यवस्था असून   प्रेम,जिव्हाळा,जपून १० जणांचे कुटुंब एकत्रित ठेऊन पाटील यांनी  समाजापुढे  आदर्श ठेवला आहे.

आशिया खंडातील अग्रेसर अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत सेवा करून उत्तुंग कारकिर्दीला सर्वसामान्य व परिवाराचा सलाम.. भगवानराव पाटील यांना सेवानिवृत्तीचे आयुष्य आरोग्यमयी, दीर्घायुष्य होवो,  याच सदिच्छा. ..!

        *शब्दांकन*

- विजय खंडागळे (सोनई )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या