Ticker

6/Breaking/ticker-posts

भाऊबंद्की : देवदैठण येथे जमिनीच्या वादातून भावानेच केला भावाचा खून..

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

देवदैठण (ता. श्रीगोंदा): तालुक्यातील देवदैठण येथे पांडुरंग पवार रा.पिंपळनेर या ५२ वर्षीय व्यक्तीचा डोक्यात गोळी घालून खून करण्यात आल्याची घटना घडली असून याप्रकरणी तिघा संशियताना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान हा खून जमिनीच्या वादातून झाला असून हा खून मयताच्या भावानेच केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शिरूर रस्त्यानजीक देवदैठण येथील एक मृतदेह आढळून आला होता.बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मयत व्यक्तीच्या डोक्यात गोळी लागली असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले . बेलवंडी पोलिसांनी मयताची ओळख पटवली असून मयत पांडुरंग पवार यांचा मुलगा सागर पवार यांनी हा मृतदेह ओळखला असून या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वडील पांडुरंग पवार व आरोपी शंकर जयवंत पवार, दत्तात्रय भाऊसाहेब लटंबळे, शिवदास शंकर रासकर व शंकर काशीनाथ जगटे हे शिरूर येथे कामानिमित्त गेले होते. काल (१०) रात्री वडील घरी आले नाहीत. वडील पांडुरंग पवार व चुलते शंकर पवार यांच्यात जमिनीवरून वाद होते.या वादातूनच वरील आरोपीसोबत संगनमत करून बंदुकीसारख्या शस्त्र अगर टणक वस्तूने डोक्यात प्रहार करून जीवे मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार मयताची ओळख पटली आहे. तिघे संशियत आरोपी ताब्यात असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पुणे येथे पाठविण्यात आला आहे. नेमका मृत्यू कसा झाला हे स्पष्ठ झाले नसल्याने पुणे येथे मृतदेह पाठविण्यात आला असून तिथे शवविच्छेदन होणार आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिक स्पष्ठता येईल.

 घटनास्थळी पाहणी करताना अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संपत शिंदे. मयताच्या मुलाने फिर्यादीत आरोपी व खुनाचे कारण नमूद केले असले तरी या पाठीमागे इतरही काही कारण आहे का याचा तपास करत आहोत.
मयत व संशियत आरोपी ज्या हॉटेल वर जेवण्यास गेले होते त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासाच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या