लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर:नगरमधील कोठी चौकातील पाटील ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये मध्ये सशुल्क करोना लसीकरणाचा उपमहापौर भोसले यांच्या हस्ते शुभारंभ. करोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता लसीकरण वेगाने होणे गरजेचे आहे. महानगरपालिकेच्या केंद्रावर मोफत लसीकरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु, अनेकवेळा गर्दी तसेच अन्य कारणांमुळे या केंद्रावर जाणे नागरिकांना शक्य होत नाही. त्यांच्यासाठी शहरातील खासगी हॉस्पिटल्समध्ये सशुल्क लसीकरणास परवानगी देण्यात आली आहे. महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा फायदा होईल व लसीकरणाचाही वेग वाढेल असा विश्वास उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केला आहे.
पाटील हॉस्पिटलमध्ये
महानगरपालिकेच्या मान्यतेने सशुल्क कोविड लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच
करोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करून नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे
.कोविशिल्ड तसेच कोव्हॅक्सिन लस ,उपलब्ध आहे अशी
माहिती डॉ.विजय पाटील यांनी दिली.या उपक्रम मुळे शासकीय लसीकरण केंद्रांवरील ताणही
कमी होण्यास मदत होईल व लसीकरण वेगाने होण्यास मदत होईल वेग येईल व ही आज अत्यंत
महत्त्वाची बाब आहे असे डॉ.विजय यांनी सांगितले.
या प्रसंगी डॉ.विजय पाटील,
डॉ.प्राची पाटील, डॉ.अरुण वाणी, डॉ.गणेश बागल,किशोर नागरगोजे, अंजली
वामन, राजु भिंगारे,रमेश पवार, चंद्रकांत मनोहर, दिलीप चितळे ,अलेश वैद्य,आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या