Ticker

6/Breaking/ticker-posts

माजी सैनिकांचे पर्यावरण संवर्धनाचे हे क्रांतीकारक पाऊल- अप्पर आयुक्त भानुदास पालवे

* जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचा पुढाकार

*कोल्हार डोंगर माथ्यावर साकारले राज्यातील पहिले स्मृती उद्यान

*दिवंगत व्यक्तींच्या नावाने लावले प्रत्येकी दोन झाडे









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

चिचोंडी शिराळ(ता. पाथर्डी) : डोंगर माथ्यावर माजी सैनिकांनी राज्यातील पहिले स्मृती उद्यान साकारुन, वृक्षरोपणाने समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. जिल्ह्यातील डोंगररांगा हिरवाईने फुलविण्यासाठी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने सुरु असलेले वृक्षरोपण व संवर्धन अभियान प्रेरणादायी आहे. माजी सैनिकांचे  पर्यावरण संवर्धनाचे हे क्रांतीकारक पाऊल असल्याचे प्रतिपादन नाशिक विभागीय अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी केले.  

कोल्हार (ता. पाथर्डी) येथे जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने स्मृती उद्यान साकारण्यासाठी 450 दिवंगत व्यक्तीच्या नावाने 1 हजार देशी रानटी व फळझाडे लावण्यात आले. यावेळी पालवे बोलत होते. यावेळी वनविभागचे आरएफओ प्रविण डमाळे, माजी सभापती संभाजी पालवे, सरपंच शोभाताई पालवे, शिवाजी पालवे, महादेव पालवे, नामदेव जावळे, अ‍ॅड. शिवाजी डमाळे, अ‍ॅड. जयराम भगत, अ‍ॅड. शिवाजी डमाळे, अ‍ॅड. संदिप जावळे, अ‍ॅड. संदिप डमाळे, समाजसेवक रघुनाथ औटी, नंदु पालवे, जय हिंदचे शिवाजी पालवे, संतोष मगर, शिवाजी गर्जे, बाबाजी पालवे, शिवाजी पठाडे, राहुल कानडे, विनोद पडोळेसचिन दहिफळे, प्रा. प्रेमकुमार पालवे, विष्णू गिते, दिनकर डमाळे, आजिनाथ पालवे, नवनाथ पालवे, महादेव पालवे, धर्मनाथ पालवे, चंदू नेटके, अनिता नेटके, सुनिताताई गर्जे, भाऊसाहेब डमाळे, शरमा पालवे, आजिनाथ पालवे, बाबू पालवे, बाळासाहेब पालवे, शंकर डमाळे, सोपानराव पालवे, साहेबा पालवे, विष्णू डमाळे, गुलाब भाई, छाया गर्जे, योगिता तेल्होरे, आशा जावळेछाया पालवे, सुनिता घुले, संध्या पालवे, लक्ष्मी पालवे, सविता आंधळे, सुजाता पालवे आदी उपस्थित होते. 

 स्मृती उद्यान प्रकल्प अभियानाची सुरुवात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते वृक्षरोपणाने करण्यात आली. कोल्हार गावातील सर्व दिवंगत व्यक्तीच्या नावाने त्यांच्या नातेवाईकांनी प्रत्येकी दोन झाडे लावली. राज्यातील पहिला डोंगर माथ्यावरील हा स्मृती उद्यान नावरुपास येणार आहे. यामुळे दिवंगत व्यक्तीची आठवण झाडांच्या रुपाने जिवंत राहणार असून, लावलेल्या झाडाचे संवर्धन देखील दिवंगत व्यक्तीचे नातेवाईक उत्तम प्रकारे करणार आहे. यामध्ये चिंच, भोकर, आवळा, सिताफळ, जांभूळ, पेरू, आंबा  या झाडांची लागवड करण्यात आली आहे. या स्मृती उद्यानाने डोंगर परिसर बहरणार असून, पर्यावरणाचे समतोल साधले जाणार असल्याचे फाऊंडेशनचे शिवाजी पालवे यांनी स्पष्ट केले. 

वनविभागचे आरएफओ प्रविण डमाळे म्हणाले की, निसर्गाप्रती आस्था ठेऊन वृक्षरोपण करणे सद्य परिस्थितीमध्ये खरी देशभक्ती ठरणार आहे. वृक्षांची बेसुमार कत्तल झाल्याने पर्यावरणाचे समतोल ढासळून नैसर्गिक संकटात वाढ झाली आहे. मनुष्याचे असतित्व निसर्गामुळे टिकून असून, मनुष्याने सामाजिक योगदान व समाजाचे ऋण फेडण्यासाठी वृक्ष रोपण व संवर्धन काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले. गावाचे सरपंच शिवाजी पालवे यांनी माजी सैनिक कोल्हार गाव आदर्श करण्यासाठी सहकार्य करीत आहे. मागील वर्षी लावण्यात आलेली पाचशे वडाची झाडे मोठी झाली आहे. ऑक्सिजनसाठी झाडाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. माजी सभापती संभाजी पालवे यांनी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या सामाजिक व पर्यावरण संवर्धनासाठी सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले. आभार मेजर संतोष मगर यांनी मानले. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या