लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पाथर्डी :संघर्षयोध्दा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अँड श्री प्रतापराव ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. १८ जुलै २०२१ रोजी शहरातील संस्कार भवन येथे सकाळी ११ वा. अभिष्टचिंतन सोहळा व शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील कोरोना योध्द्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
याकार्यक्रमासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे कर्तबगार आमदार रोहित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके, नगरचे आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील उपस्थित राहणार आहेत. गेल्या तीस वर्षांपासून अॅड. प्रतापकाका ढाकणे यांची शेवगाव व पाथर्डी तालुक्यात राजकीय वाटचाल सुरू असून आजपर्यंतच्या राजकीय कार्यकाळात त्यांनी दोन्ही तालुक्यातील सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच आघाडी घेतलेली आहे.
केदारेश्वर कोविड सेंटर व सुमन कोविड सेंटरच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी मोफत व्यवस्था सुमारे अडीच महिने त्यांच्याकडून करण्यात आल्याने हजारो कोविड रूग्णांना मोठा दिलासा मिळाला. या कार्यक्रमास जनतेने कोरोना नियमांचे पालन करून उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अॅड. प्रतापकाका ढाकणे मित्रमंडळाकडून करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या