*मिरी रोडवरील ममता लांन्सम मंगल कार्यालय केले सील
*नियम मोडणार्यारांवर तहसीलदारांची दंडात्मक कारवाई
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : तालुक्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या
आटोक्यात आणण्यासाठी शेवगाव तालुका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून काल आज
गुरुवार दि २९ रोजी मिरी रोड लगत असलेल्या ममता
लांन्समध्ये लग्न समारंभामध्ये ५० पेक्षा जास्त गर्दी झाल्याने व कोविड नियमाचे उल्लंघन केल्यामुळे वधु-वर, आई-वडील व मंगल कार्यालयाचे मालक यांच्यावर गुन्हे
दाखल करुन मंगल कार्यालय सील करण्यात आले या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मागील आठवड्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी
झपाट्याने वाढत आहे. शेवगाव तालुक्यातही आकडेवारीचे प्रमाण कासवगतीने वाढत आहे.
कोरोना बाधितांची आकडेवारी आटोक्यात ठेवण्यासाठी तालुका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
आले आहे. शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी पोलिस प्रशासन व शेवगाव
नगरपालिका प्रशासन यांच्या मदतीने शेवगाव शहरात नियम मोडणार्यांवर धडक कारवाईचा सपाटा लावला आहे . त्यामुळे अनेकांचे ढाबे दणाणले
आहेत. आज थेट गर्दी झालेले मंगल कार्यालय सील करून नवरा-नवरीसह वर्हाडी मंडळींवर दंडात्मक कारवाई झाल्यामुळे याची तालुक्यात जोरदार चर्चा झडत
आहे .
या कारवाईमध्ये निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवणार्या सहा
दुकान मालकांवर कारवाई करत तीन हजार रुपयाचा दंड वसूल केला. तर शहरात विनामास्क
फिरणार्या ७ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत १४०० रुपयाचा दंड वसूल केला आहे. तालुका
प्रशासनाने आतापर्यंत मास्क न घालणार्या ४ हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली
आहे. तसेच नियम मोडणारी मंगल कार्यालये, लॉन्स, दुकाने,
हॉटेल व्यावसायिक, खाजगी अस्थापने यांच्यावर
मोठ्या प्रमाणात कारवाई करत दंड वसूल केला आहे. यापुढे नियम मोडणार्यांवर
भविष्यात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
पथकाने निर्धारीत वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवणार्या सहा दुकानाच्या
मालकांसह मास्क न घातलेल्या ७ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली आहे. व्यावसायिक व
नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार
अर्चना पागिरे यांनी केले आहे.
नियमाचे उल्लंघन करणारावर कारवाई
‘नागरिकांनी
विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित तोंडाला मास्क लावावा.
व्यावसायिकांनी आपली दुकाने शासनाने ठरवून दिलेल्या निर्धारीत वेळेतच उघडी ठेवावी,
अन्यथा दुकानांवर सीलबंदची कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार अर्चना
पागिरे यांनी दिला आहे. ‘-तहसीलदार अर्चना पागिरे
0 टिप्पण्या