लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मनिला: दक्षिण चीन समुद्रात वर्चस्व वाढवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या चीनला
फिलीपाइन्सचे धक्का दिला आहे. फिलीपाइन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी
अमेरिकन सैन्यासह व्यापक युद्ध सरावाच्या कराराला पुन्हा मंजुरी दिली आहे. दोन्ही
देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी शुक्रवारी या निर्णयाची घोषणा केली. याआधी
राष्ट्रपती दुतर्ते यांनी हा करार रद्द केला होता. त्यामुळे अमेरिकेची वाढली होती.
त्याशिवाय चीनने फिलीपाइन्सला लस डिप्लोमसीद्वारे आणि इतर मार्गांनी आपल्याकडे
वळवण्याचे प्रयत्न केले होते. जेणेकरून फिलीपाइन्स पुन्हा एकदा अमेरिकेसोबत करार
करू नये.
या
करारानुसार फिलीपाइन्स आणि अमेरिकन सुरक्षा दला दरम्यान मोठ्या प्रमाणावर युद्ध
सराव केला जातो. फिलीपाइन्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, परराष्ट्र मंत्री टियोडोरो लोसिन ज्यूनिएर हे व्हिजिटींग
फोर्स अॅग्रिमेंटशी संबंधित असलेले दस्ताऐवज शुक्रवारी एका बैठकीत अमेरिकेचे
संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांना देतील.
फिलीपाइन्सचे संरक्षण मंत्री डेल्फिन
लोरेनजाना यांनी सांगितले की, राष्ट्रपती दुर्तेते यांनी करार रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऑस्टिन यांनी फिलीपाइन्सच्या निर्णयाचे स्वागत केले.
दोन्ही देशांमधील संरक्षण क्षेत्रातील संबंध आणखी दृढ होतील असेही त्यांनी म्हटले.
दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या
दादागिरीचा फटका फिलीपाइन्सलाही बसत आहे. तर,
अमेरिकेलाही दक्षिण समुद्रात चीनची कोंडी करण्यासाठी आणखी एका
देशाचे सहकार्य हवे आहे. त्याच्या परिणामी फिलीपाइन्सने पुन्हा एकदा अमेरिकासोबत
पुन्हा एकदा करार केला असल्याची चर्चा सुरू आहे.
0 टिप्पण्या