लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नगर : करंजी (ता.पाथर्डी) येथील आरोग्य उपकेंद्रातच डॉ.गणेश गोवर्धन शेळके यांनी आत्महत्या केली. त्यांनी सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे,त्याप्रमाणेसंबंधितांवर कारवाई करावी,अशी मागणी ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाच्यावतीने दक्षिण जिल्हाअध्क्ष सुनिल भिंगारे यांनी केली आहे.
भिंगारे यांनी पदाधिकार्यांसह सिव्हील हॉस्पिटलमध्ये जाऊन
डॉ.शेळके यांच्या कुटूंबियांना धीर देत त्यांचे
सांत्वन केले. तसेच दोषींना त्वरित अटक करावी, अशी मागणी उपअधिक्षक सुदर्शन मुंडे यांच्याकडे केली. यावेळीजनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दूरध्वनीवरुन संपर्क करुन परिस्थितीची माहिती घेतली. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली.
डॉ.शेळके यांचा मृतदेह12 तासानंतर घाटीला पाठविण्यात आला ,मृत्यूनंतर ही मृतदेहाची हेटाळली झाली. यांचे गांभीर्य कोणाच्या लक्षात आले नाही, असा गोंधळ रुग्णालयाच्या दारात पहायला मिळाला. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन ओबीसी जनमोर्चाच्या पदाधिकार्यांनी तात्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यात शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल भिंगारे, उपाध्यक्ष रमेश सानप, नईम शेख आदिंनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये जाउन डॉ.शेळके कुटूंबियांशी व पोलिस प्रशासनाशी चर्चा केली. या प्रकरणी जनमोर्चा लक्ष ठेवून असून मयत शेळके सारख्या उमद्या डॉक्टर आत्महत्येपर्यंत येतो, त्यामागे वरिष्ठांचा जाच कसा असेल? याची दखल घेण्याची गरज आहे, असे यावेळी श्री.रमेश सानप यांनी सांगितले. या संपूर्ण
प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काल कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
0 टिप्पण्या