*रिंकू राजगुरूने सोशल
मीडियावर शेअर केली स्पेशल पोस्ट
*आकाश ठोसर- रिंकूच्या पोस्टवर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क
मुंबई: नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला 'सैराट' हा सिनेमा २९ एप्रिल २०१६ रोजी
प्रदर्शित झाला होता. १०० कोटींच्या जवळ जाणारा हा पहिला सिनेमा होता. एका रात्रीत
स्टार होणं काय असतं हे रिंकू राजगुरून आणि आकाश ठोसर यांनी तेव्हा अनुभवलं होतं.
सिनेमातील आर्ची आणि परश्या या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.
आता हे दोघे नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या सिनेमात ते महानायक अमिताभ
बच्चन यांच्यासोबत काम करणार आहेत.
रिंकू आणि आकाशची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना
खूपच आवडली होती. खऱ्या आयुष्यामध्ये रिंकू आणि आकाश हे छान मित्र आहेत. अलिकडेच
हे दोघेजण भेटले होते. त्या दोघांच्या भेटीचे फोटो रिंकून तिच्या इन्स्टाग्राम
अकाउंटवरून शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे, 'जेव्हा तुमचा जुना मित्र खूप दिवसांनी
भेटतो तेव्हा प्रचंड आनंद होतो. या भेटीत जेव्हा कळतं की काहीच बदललं नाही तेव्हा
हा आनंद द्विगुणीत होतो.' रिंकू प्रमाणेच आकाशने देखील
त्याच्या इन्स्टाग्रामवर या दोघांचे फोटो शेअर केले आहेत.
दरम्यान, रिंकूच्या पोस्टवर त्या
दोघांचेही चाहते भरभरून लाइक आणि कमेन्ट करत आहेत. काहींनी म्हटले आहे की तुम्हाला
दोघांना एकत्र पाहून खूप आनंद झाला आहे. या दोघांची जोडी ऑनस्क्रिन खूपच छान दिसली
होती. त्यामुळे त्यांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांना जोडीदार म्हणून निवडावे,
अशी भावना काही चाहत्यांची आहे. त्यामुळेच एका चाहत्याने या पोस्टवर
लिहिले की, 'तुम्ही दोघे लग्न कधी करणार आहात.' तर आणखी एका युझरने ही बेस्ट जोडी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
अनेकांनी या दोघांना पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र काम करताना बघायचे आहे, अशा कमेन्टमधून सांगितले आहे.
0 टिप्पण्या