Ticker

6/Breaking/ticker-posts

ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांच्या पादुका पंढरपुरात दाखल

 पौर्णीमा काला होईपर्यंत भगवानगडाच्या मठात मुक्काम









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 

 

भगवानगड: हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांच्या चरणपादुका मंगळवारी भगवानगडावरून वाहनामध्ये नेहुन   पंढरपुरात दाखल झाल्या असुन पौर्णीमा काला होईपर्यंत भगवान गडाच्या पंढरपूर येथील मठातच त्या विसावणार असल्याची माहिती भगवानगडाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी यांनी सांगितली .

संत भगवान बाबांनी गडावरून पायी दिंडी सोहळा सुरू केला होता परंपरेप्रमाणे संत भिमसिह महाराज यांनी देखील तो वसा चालवला होता ,त्यानंतर विद्यमान महंत डॉ न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी तीच परंपरा अखंडीत पणे सुरू ठेवली मात्र गेल्या वर्षी व यंदाही कोरोनाचे संकट आडवे आल्याने शासन निर्देशानुसार दिंडी परंपरा ही संतपादुका वाहनामधे नेऊन औपचारिकता पुर्ण करावी लागली ,महंत नामदेव महाराज शास्त्री  यांचे अनूज्ञेवरून मंगळवारी भगवान गडावरून यथावत पुजा करून पादुकांचे प्रस्थान झाले , भगवानडाचा साधक वर्ग पादुका प्रस्थानवेळी आवर्जून उपस्थित होता .पादुका सोबत  प्रधान आचार्य नारायण स्वामी सह अॅड जगन्नाथ  बटूळे ,जिवन सानप ,बळीराम महाराज आदी मंडळी समवेत होती .

 पढंरपुर येथे पोहचल्यानतंर संत पादुकांना चंद्रभागेचे तिर्थ स्नान घालुन परिक्रमा पुर्ण केल्यानंतर मठात विसावल्या असुन काला झाल्यानंतर त्यांना गडावर आणले जाणार असल्याचे सांगितले . श्रीक्षेत्र भगवानगडावरून हा दिंडी सोहळा हजारो भाविकांसह पंढरपूरला जात असतो दहा मुक्काम करून पंढरपुरला पोहचत असतो मात्र कोरोना मुळे गेल्या वर्षी प्रमाणे याहिवर्षी वाहनाद्वारेच पादुका पंढरपुरला पोहचल्या आहेत ,संतासमवेत भजन करत पायी चालत जाणा-या वारक-यांना मात्र या आनंदाला पारखे व्हावे लागले आहे .

श्रीक्षेत्र भगवानगड ते पंढरपुर आषाढी महावारी  पायी दिंडी सोहळा ऐश्वर्य संपन्न श्रीसंत भगवान बाबांनी पायी वारी सुरू केला होती संत भगवान बाबानी श्री क्षेत्र भगवान गडाच्या स्थापणे पुर्वी श्री क्षेत्र नारायण गडा हुन सण १९२१ मध्ये  पायी पढंरपुर दिडीं सुरू केली होती संत भगवान बाबाच्या निर्वतणानतंर भगवान गडाचे  द्वितीय मठाधीपती वै भिमसिंह महाराज यांनी हि परमंपरा चालु ठेवली सण २००३ मध्ये भगवान गडाचे तितीय मठाधीपती पदी डॅा नामदेव शास्त्री झाल्यावर त्यांनी भगवान गडाच्या दिंडी चे दिव्य स्वरूपात पालखी सोहळ्यात रूपांतर करत पादुका साठी  विशेष रथ तयार करत   भव्यदिव्य  पालखी सोहळा म्हणुण भर घातली .

भगवान गडाची नाथ ही गुरू परंमपरा असल्याने पढंरपुर मध्ये संत एकनाथ महाराजाच्या पालखी सोहळयाचा प्रवेश होण्यापुर्वी   आपल्या गुरुपरंपरेची सेवा म्हणून संत एकनाथ  महाराजाच्या  पालखीला आडवे जाण्याचा मान श्रीक्षेत्र भगवान गडाच्या  पालखी ला  आहे. भगवानगडाची पालखी नेहण्यास आल्याशिवाय संत एकनाथाची पालखी पढंरपुर मध्ये प्रवेश करत नाही  ती परंपरा आजतागायत सुरू आहे .मात्र गेल्या वर्षी व याही  वर्षी "कोरोना" महामारीने देशभरात कहर माजवला पर्यायाने सर्वच मोठ मोठ्या कार्यक्रमावर निर्बंध लादले गेले त्यात धार्मीक कार्यक्रमाचा सुध्दा समावेश असुन लाखोंचा भक्त  समुदाय सोबत घेऊन शेकडो वर्षापासुन "ज्ञानोबा तुकोबा" सह अन्य संतांच्या चालणा-या सोहळ्यावर बंधन आली . व परंमपरा ही खंडीत होऊ लागल्या याचे शल्य वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसुन येत आहे 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या