*बॉलिवूडच्या हिट
अभिनेत्रींपैकी एक आहे कतरिना कैफ
*बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी
कतरिनाने बदललं नाव
*प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी देवदर्शनासाठी जाते कतरिना
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सोशल मीडियावर चर्चेत असते. आज
कतरिनाचा ३८ वा वाढदिवस आहे. २००३ साली 'बूम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी कतरिना आता सगळ्यांच्या मनावर
राज्य करतेय. सध्या कतरिना अभिनेता विकी कौशल याला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
त्यापूर्वी कतरिनाचं नाव अभिनेता रणबीर कपूर आणि सलमान खानसोबतही जोडलं गेलं होतं.
सलमानमुळे कतरिनाला अनेक चित्रपटांत काम मिळाल्याचं देखील बोललं जातं. आपल्या
अदांनी चाहत्यांना भुरळ पाडणारी कतरिना पहिल्याच चित्रपटात दिलेल्या किसिंग
सीनमुळे प्रचंड चर्चेत आली होती.
कतरिनाने
अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटात काम करून केली होती.
२००३ साली दिग्दर्शक कायजाद गुस्ताद यांनी कतरिनाला एका फॅशन शोमध्ये पाहिलं आणि
तिला 'बूम' चित्रपट
ऑफर केला. या चित्रपटात एक सीन होता जिथे कतरिनाला गुलशन ग्रोवर यांना किस करायचं होतं. त्या प्रसंगी अमिताभ बच्चन देखील तिथे
उपस्थित होते. असं म्हटलं जातं की गुलशन आणि कतरिना यांनी २ तास एका खोलीत किस
करण्याची प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर सीन पूर्ण केला. गुलशन आणि कतरिना यांच्या
त्या किसिंग सीनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यांचा चित्रपटातील किसिंग
सीन प्रचंड चर्चेत होता.
चित्रपट
प्रदर्शनानंतर या सीनवरून अनेक वाद निर्माण झाले होते. जेव्हा कतरिनाला 'बूम' चित्रपटातील या
सीनबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा कतरिनाने म्हटलं, 'हा
सीन दिला पण तेव्हा मी प्रचंड अस्वस्थ होते. मी सीनला नाही म्हटलं नाही पण
माझ्यासाठी ते सोपं नव्हतं.' कतरिना आणि गुलशन यांचा
चित्रपटातील तो सीन आजही इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो. युट्युबवरही तो
सीन कोट्यवधी वेळा पाहिला गेला आहे.
0 टिप्पण्या