*लग्नातील वाजंत्री थांबवली पण आता राजकीय वाजंत्री बंद कसे करणार.
*राजकीय कार्यक्रमाला निर्बंध पाळले नाही तर गुन्हे दाखल करणार!
*तहसीलदार ज्योती देवरे यांची माहिती.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
एकीकडे रुग्ण संख्या वाढत असताना प्रशासन त्याला आटोक्यात
आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. महसूल व आरोग्य विभागाचे पथक गेल्या दीड
वर्षापासून सातत्याने कोरोना कामामध्ये स्वतःला झोकून देत आहे प्रत्येक गावांमध्ये
आरोग्य तपासणी करत आहे तर दुसरीकडे नागरिक निर्बंधाची काटेकोरपणे पालन करताना दिसत
आहेत मात्र राजकीय कार्यक्रमांमध्ये काही प्रमाणात पालन होत नसल्याचे निदर्शनास येते,नुकत्याच एका ठिकाणी झालेल्या राजकीय कार्यक्रमात वाजंत्री वाजत गाजत
पुढाऱ्यांचे स्वागत केले गेले. हि व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांद्वारे व्हायरल झाली.
त्यावर अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले असून तहसीलदार ज्योती देवरे यांनी दखल घेत सर्वच
कार्यक्रमातील बंद करण्याचे आदेश दिले .
सर्व
राजकीय सामाजिक कार्यक्रमांना उपक्रमांना यापूर्वीच सांगितले त्याप्रमाणे ५०व्यक्तींसाठी
बंधन होते ते आता पंचवीस व्यक्तींवर आणत आहेत कोणत्याही राजकीय कार्यक्रमाला
सामाजिक कार्यक्रमाला २५पेक्षा अधिक व्यक्तींनी गर्दी केल्यास आणि त्या ठिकाणी
सामाजिक अंतराचे पालन होत नसेल मास्क लावलेले नसतील तर नियमाप्रमाणे फौजदारी गुन्हे
सुद्धा वेळ प्रसंगी दाखल केले जातील असेही तहसीलदार ज्योती देवरे यानी स्पष्ट्पणे सांगितले.
त्यामुळे आता निर्बंधांचा फास अधिक आवळ्ला गेला आहे.
0 टिप्पण्या