Ticker

6/Breaking/ticker-posts

“वाल्ह्याचा वाल्मिकी” डॅडीला लागलेत आता ग्रॅज्युएटचे वेध !; अरुण गवळीने 'बीए'ची परीक्षा दिली पण...

 *अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी बीए परीक्षेत पहिल्या प्रयत्नात तीन विषयांत पास.

*पदवी शिक्षण पूर्ण करण्यासाठी परत परीक्षा देणार.







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नागपूर: अंडरवर्ल्ड मध्ये डॅडी म्हणून ओळखला जाणारा अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. कारावासातील या वेळेचा सदुपयोग करत त्याने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (इग्नु) बी. ए. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असून अंतिम वर्षाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

 मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर  यांच्या खून प्रकरणात अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वेळोवेळी फर्लो, पॅरोलसाठी अर्ज करून गवळी मुंबईची वारी करत आला आहे. दरम्यान गवळीने २०१८ मध्ये इग्नूत प्रवेश घेतला. 

याबाबत अधिक सांगताना इग्नूच्या विभागीय केंद्राचे संचालक डॉ. पी. शिवस्वरुप म्हणाले,‘इग्नुचे सर्व अभ्यासक्रम हे विद्यार्थिभिमुख आहेत. तीन वर्षांचा बी. ए. अभ्यासक्रम सहा वर्षांमध्ये पूर्ण करण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात येते. गवळीने काही महिन्यांपूर्वी अंतिम वर्षाची परीक्षा दिली. त्यात पाचपैकी तीन विषयांत तो उत्तीर्ण झाला आहे. आमच्या दृष्टीने गवळीचे उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण होणे महत्त्वाचे नाही. शिक्षा भोगत असताना त्याने अभ्यासाकडे वळत परिवर्तनाचा मार्ग स्वीकारल्याचे समाधान अधिक आहे.

गवळीने यापूर्वी ऑगस्ट २०१८ मध्ये गांधी विचार मंचच्या परीक्षेत टॉप केले होते. त्याने ८० पैकी ७४ गुण प्राप्त केले होते. त्यानंतर आता तो बी. ए. अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या