Ticker

6/Breaking/ticker-posts

‘करोना काळात भंपकबाजी न करता मुख्यमंत्र्यांनी थेट काम केलं'

 *नगर जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान जोमात सुरु





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 कोपरगाव : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात सक्रीय सहभाग घेतला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी मेळावे घेऊन ते सरकार आणि शिवसेनेचे काम लोकांना सांगत आहेत. कोपरगाव येथील मेळाव्यात बोलताना गडाख म्हणाले, ‘करोनाच्या काळात मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे  यांनी थाळ्या आणि टाळ्या वाजविण्याची भंपकबाजी न करता मुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी संयमीपणे पार पाडली.

कोपरगाव येथील शिवसंपर्क अभियानाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, सपना मोरे, सुहास वहाडणे, डॉ. अजय गर्जे, प्रमोद लबडे, बाळासाहेब जाधव, सुनिल तिवारी, वर्षा शिंगाडे, विक्रांत झावरे, मुकुंद सिनगर, प्रफुल्ल शिंगाडे यांच्यासह पदाधिकारी, महिला व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना गडाख यांनी मुख्यमंत्र्यांचे कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘राज्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चांगले काम केले आणि करीत आहोत. हे सांगण्याची एक संधी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांना मिळाली आहे. अनेक वर्षांच्या युतीने विश्वासघात केल्यानंतर जाहीरपणे बोलता येईना आणि कुणाला सांगता येईना. तेव्हा नवीन प्रयोग करीत महाविकास आघाडीची स्थापना झाली. मुख्यमंत्री कोण ? यावर खल सुरू असताना पक्ष चालविणे वेगळे आणि सरकार चालविणे वेगळे असे खुलेपणाने सांगणारे केवळ उद्धव ठाकरे हेच होते. इच्छा नसतानाही ते मुख्यमंत्री झाले, ते केवळ तुमच्या आमच्यासाठीच. पैशाचा हिशोब न करता आर्थिक मेळ बसत नसतानाही शेतकऱ्यांना २४ हजार कोटींची कर्जमाफी खुलेपणाने दिली.

करोना काळात थाळ्या आणि टाळ्या वाजविण्याची भंपकबाजी केली नाही. थेट जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवात केली. तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची सर्व तयारीही केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या