लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
टाकळी मानूर : पवार व ढाकणे कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीने जनहितासाठी संघर्ष करावा असा सल्ला ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांनी आ.रोहित पवारांना दिला .राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मागील आठवड्यात अड प्रतापराव ढाकणे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यास आवर्जून हजेरी लावल्यामुळे ढाकणे व पवार कुटुंबियांचे तीन पिढयाचे ऋणानुबंध पुन्हा अधोरेखित झाले .
ज्येष्ठ नेते शरद पवार बबनराव ढाकणे यांच्या नंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एडवोकेट प्रतापराव ढाकणे व त्यानंतर आमदार रोहित पवार व ऋषिकेश ढाकणे व सिद्धेश ढाकणे असा ऋणानुबंध जपला गेला आहे. आ.पवार यांच्या दौऱ्यामुळे स्थानिक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना बळ मिळाले .
कार्यक्रम नंतर आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांची आस्थेने विचारपूस केली दोघांमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झाली. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी गेल्या रविवारी एडवोकेट प्रतापराव ढाकणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या उपस्थिती लावत पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना उत्साहित केले .
कार्यक्रमात त्यांनी ढाकणे व पावर कुटुंबीयांमध्ये असलेल्या कौटुंबिक संबंधांना उजाळा दिला. श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे भूमिपूजन तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांचेसमवेत संरक्षण मंत्री शरदचंद्रजी पवार उपस्थित होते. त्यानंतर याच कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामास पहिली उसाची मोळी माझे आजोबा अप्पासाहेब पवार यांच्या हस्ते टाकण्यात आली, याची आठवण रोहित पवार यांनी करून दिली .
कारखान्याच्या प्रत्येक अडचणीवर जेष्ठ नेते शरद पवार व अजित दादा पवार यांनी मार्गदर्शन करून ती सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. हा कारखाना ऊस तोडणी कामगारांच्या सहभागातून उभा करण्यात योगदान दिले आहे. असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
0 टिप्पण्या