Ticker

6/Breaking/ticker-posts

कोविडग्रस्त मृतांच्या कुटूबियांना मदतनिधी ; शिक्षक संघटनांचा उपक्रम प्रेरणादायी - डॉ. तांबे

 







कोविडमुळे मयत झालेल्या शिक्षकांच्या वारसांसाठी नगर शहर व तालुक्यातील शिक्षकांनी संकलित केलेल्या मदत निधीचे धनादेश देतांना आ. डॉ. सुधीर तांबे समवेत शिक्षकनेते राजेंद्र लांडे व इतर शिक्षक संघटनांचे पदाधिकारी. 

 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर: कोविड महामारीत मयत झालेल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबियांना शिक्षक संघटनांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे नातेवाईकांना पेक्षाही जास्त काळजी घेणारे आपले कोणीतरी आहे असा संदेश समाजात गेला आहे. अशा उपक्रमांमुळे दुसऱ्याच्या दुःखा सहभागी होऊन सहकार्य करण्याची प्रवृत्ती समाजात निर्माण होईल असे प्रतिपादन आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले.

 कोविडमुळे नगर शहर व तालुक्या मयत झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत  वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष राजेंद्र लांडे हे होते. कोविडच्या लाटेत मयत झालेल्या व ज्यांना फॅमिली पेन्शन ग्रॅज्युटी चा लाभ मिळणार नाही अशा नगर शहर व तालुक्यातील चार माध्यमिक शिक्षक, दोन उच्च माध्यमिक प्राध्यापक  एक मुख्याध्याप यांच्या वारसांना प्रत्येकी 80 हजार रुपये व आर्थिक दृष्ट्या खूपच अडचणीत आलेल्या पाच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या वारसांना देखील प्रत्येकी वीस हजार रुपये अशी एकूण सहा लाख ६७ हजार रुपयांची आर्थिक मदत धनादेशाद्वारे देण्यात आली.

शिक्षक नेते राजेंद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर महानगर माध्यमिक शिक्षक संघ मुख्याध्यापक संघ, इतर शिक्षक संघटना व सेवानिवृत्त शिक्षकांच्या सहकार्यातून नगर शहर व तालुक्यातील शाळांमधील एकूण सहा लाख ६७ हजार रुपयांचा निधी जमा केला होता. 

 या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित, प्राचार्य अशोक दोडके, शिक्षक नेते बाबासाहेब कोकाटे सुधीर काळे, रयत शिक्षण संस्थेचे इन्स्पेक्टर तुकाराम कन्हेरकर, काकासाहेब वाळुंजकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. निधी संकलनसाठी धनंजय म्हस्के, महादेव भद्रे, रावसाहेब बाबर, ज्ञानदेव बेरड विष्णू मगर, भाऊसाहेब रोकडे, उत्तम कांडेकरजफर सय्यद, अन्सार शेख यांनी परिश्रम घेतले असल्याची माहिती संघटनेचे सचिव शंकर बारस्कर यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय निक्रड, योगेश मोरे, गणेश उघडे, सखाराम गारुडकर, अनिल सुद्रिक, शरद सोनवणेनितीन म्हस्के, कैलास देशमुख कैलास साखरे, वैभव सांगळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय मस्के यांनी तर आभार महादेव धोत्रे यांनी मानले.

 

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या